100 टक्के बंद पाळून जालन्यात किराणा व्यापाऱ्यांचा जीएसटीला विरोध

100 टक्के बंद पाळून जालन्यात किराणा व्यापाऱ्यांचा जीएसटीला विरोध

 

आधुनिक केसरी न्यूज 

जालना : जीवनाशक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शनिवार दि. 16 जुलै रोजी नवीन मोंढ्यातील होलसेल व रिटेल किराणा मार्केट, जुना मोंढ्यातील किराणा व्यापाऱ्यांनी 100 टक्के बंद पाळून जीएसटीला विरोध दर्शविला. गुळ मार्केट, दाल मिल, आडत व्यापाऱ्यांचाही बंदमध्ये 100% सहभाग होता, अशी माहिती जालना किराणा होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पंच यांनी दिली.

      सतीश पंच म्हणाले की, जीएसटीच्या नवीन धोरणानुसार जीवनाश्यक वस्तु, अन्नधान्य, गहु, पीठ, रवा, मैदा, दाळी, दुध, दुग्धजन्य पदार्थ, नॉन ब्रॅण्डेड वस्तुवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा अधिभार सामान्य नागरीक व ग्राहकांना बसणार असुन याचा त्रास व्यापा-यांना सुध्दा होणार आहे. यासंदर्भात दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री यांना निवेदन देण्यात येऊन जीएसटी कार्यालयातही निवेदन सादर करून आपल्या व्यथा कळविण्यात आल्या होत्या  शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आज मार्केटयार्डमधील संपुर्ण होलसेल व रिटेल किराणा मार्केट बंद ठेवण्यात आली तसेच या बंदमध्ये आडत, मार्केट, जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटीला विरोध दर्शविला. जीवनावश्यक वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी विरोधात देशव्यापी संप करण्यात आला होता, त्यास देशभर शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सतीश पंच यांनी सांगितले. कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे वृत्त हाती आल्याचे त्यांनी सांगितले.

       होलसेल किराणा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करून जीवनावश्यक वस्तूवरील पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पंच, पुरुषोत्तम अग्रवाल, दीपक अग्रवाल, अनिल पंच, किशन भक्कड , सुरेश भक्कड, अजय लोहिया, सुनील रुणवाल, यश जैन, बंटी अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

दाल,रोटी खावो प्रभू के गुण गावो...!

दाल- रोटी खावो प्रभू के गुण गावो असे केंद्र सरकार सांगत होते. मात्र याच जीवनावश्यक वस्तूवर सरकार दि. 18 जुलैपासून जीएसटी लावणार आहे. जनतेचा पोटाचा तसेच व्यापाऱ्यांच्या विरोधाचा विचार करून सरकार तसा निर्णय घेणार नाही असा आपणास विश्वास असल्याचे सतीश पंच यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पत्रकारीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर गंगासागरे पत्रकारीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर गंगासागरे
आधुनिक केसरी न्यूज तानाजी शेळगांवकर नायगाव : अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष तथा नायगांव तालुका डिजिटल मिडीया परीषदेचे...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा  
देगलूर तालुक्यातील  तमलूरचा सचिन वनंजे  शूर पुत्र देशासाठी शहीद 
शिळ्या आरोपांवरून केलेली सेवासमाप्ती चूकच  : उच्च न्यायालयाचा निर्वाळा
पाणी जपून वापरा ! पुण्यातील 'या' भागात होणार पाणी कपात
शेळगाव गौरी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व केबलची चोरी 
खुशखबर लाडक्या बहिणीचे 3000 रुपये 'या' महिन्यात खात्यात जमा होणार..!