व्यापाराचे विद्यापीठ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

व्यापाराचे विद्यापीठ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

आधुनिक केसरी न्यूज

पुणे : वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे. 

यावेळी पवारांनी व्यापारी संघाला व राजेंद्र बाठीया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली. पुण्याचा शिक्षण क्षेत्रात लौकिक आहेच. व्यापाराचे विद्यापीठ या ग्रंथाच्या प्रकाशनाने व्यापारी क्षेत्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे म्हणून देखील पुणे शहराचा नावलौकिक होईल. या पुस्तकातील प्रत्येकाची जीवनगाथा जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट, सकारात्मकता, शिस्त, चिकाटी हे गुण दर्शवते.सदर पुस्तकातील बऱ्याच व्यापाऱ्यांशी माझा जवळून संबंध आला आहे. त्यांची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. गुलटेकडी मार्केटयार्डाला विद्यापीठात रूपांतरीत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या 'मास्टर ॲाफ बिझनेस'च्या मानकऱ्यांचे अभिनंदन!

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : वन्यजीव आणि पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेला लोहाडोंगरी लोहखनिज खान प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी...
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त