माझं अहमदनगर : नगरची दिल दोस्ती दुनियादारी..!

माझं अहमदनगर : नगरची दिल दोस्ती दुनियादारी..!

खरंच किती छान टायटल आहे आजच्या लेखाचे! दिल……………दोस्ती………..दुनियादारी! आपण नगरचा साधारणपणे पन्नासवर्षापूर्वीचा विचार केला तर या तीन शब्दांची उत्तरे आपणास सहज मिळू शकतात. कारण त्या काळात या तीनही शब्दांना वलय होते दिल एकदा दिला की मग काही विचारायलाच नको.त्या काळातील असे अनेक प्रसंग आहेत की त्यामुळे दिल काय असतो हे आपणास समजायला लागते….. अहो!मी वाडिया… Continue reading माझं अहमदनगर : नगरची दिल दोस्ती दुनियादारी..!

खरंच किती छान टायटल आहे आजच्या लेखाचे!

दिल……………दोस्ती………..दुनियादारी!

आपण नगरचा साधारणपणे पन्नासवर्षापूर्वीचा विचार केला तर या तीन शब्दांची उत्तरे आपणास सहज मिळू शकतात.

कारण त्या काळात या तीनही शब्दांना वलय होते

दिल एकदा दिला की मग काही विचारायलाच नको.
त्या काळातील असे अनेक प्रसंग आहेत की त्यामुळे दिल काय असतो हे आपणास समजायला लागते…..

अहो!मी वाडिया पार्क बद्दल बोलतोय!

अतिशय सुंदर परीसर!
त्या काळातील नगरमधील एकमेव ठिकाण म्हणजे वाडीया पार्क!
मग या पार्कवर आपला दिल फिदा होणार नाही, तर काय होणार!
मधे क्रिकेटचे मैदान
आजूबाजूला छान झाडी,
मैदानावरुन दिसणारे लोकल बोर्डाचे घड्याळ टावर!
एका बाजूला कुस्तीचे मैदान !
बाजूला तालीम!
झाडांच्या बेचक्यात महादेवाचे मंदिर!
ब्रिटिश कालीन क्रिकेटचे पॕव्हेलियन!
बॕन्ड स्टॕंन्ड!
मधे कारंजे!
आजुबाजुला बाग !

पाहुण्यांना फिरायला घेऊन यायचे हे नगरमधील अतिशय रम्य ठिकाण !

कुठे गेले सर्व जण !
अहो!
वाडिया पार्कमधे गेलेत फिरायला!
हे ठरलेले उत्तर!
उन्हाळ्यात खूप छान वाटायचे!
सदा सर्वकाळ शुद्ध हवा!
म्हणजे वाडिया पार्क!

दिलसे कहता हूँ!
वाडिया पार्क विसरता येत नाही!

त्या काळात सिद्धी बागेतही छान वाटायचे.
परंतु वाडीया पार्क एकदम खास!…

अजून एक दिलसे आठवण म्हणजे
अहमदनगर काॕलेज!
बस नाम ही काफी है!

इतके सुंदर काॕलेज त्या काळात महाराष्ट्रात कुठेही नव्हते.!
सुंदर गेट!
सुंदर रस्ते!
भव्य लायब्ररी,
सुंदर चर्च,
भव्य प्रशासकीय इमारत
भले मोठे वर्ग
सायन्स लॕब
लेडीज जेन्ट्ससाठी मोठीच्या मोठी होस्टेल्स
काॕलेज परिसरातील कँन्टीन!
भरपूर झाडी,हिरवळ!

भव्य खेळाचे मैदान,व्हाॕलीबाॕल,बास्केटबाॕल क्रिकेट,फूटबाॕल,हाॕकी अशा खेळांचे एकाच वेळेस सराव चालू असणारे हे महाराष्ट्रातील नंबर एकचे काॕलेज मैदान होते !
अरे हो!
शेजारीच भव्य बॕटमिंटन हाॕल सुद्धा होता!

समोरच स्वीमिंग पूल सह तालीम!

दिलसे कहता हूँ!

ये नगर काॕलेज का नजारा आज भी आँखोंके सामने है!

यावर दिल बसायला काय वेळ लागतो!

नगरकरांनी या काॕलेजवर भरभरून प्रेम केले…

या काॕलेजमधे लेडीज आणि जेन्टस होस्टेल मधील प्रेम जुळायला वेळ लागायचा नाही!

इतकी मोकळीक या काॕलेजमधे होती.

दिल दे चुके सनम!

दिलसे कहता हूँ !

अतिशय मनोहरी दिवस होते नगर काॕलेजचे !

चला!
आता थेट जाऊ,चितळेरोडवर या रोडवर नगरकरांनी जीव ओवाळून टाकला होता….

नवीपेठेपासून सुरु होणारा हा रोड दिल्लीगेटला संपत असे.
आजूबाजूला नगरवाचन मंदिर,छाया टाॕकीज, विविध दुकाने हाॕटेल,नेहरू मार्केटमधील घड्याळ वाले टावर,मंदिर मज्जिद अशी विविधता असलेला हा रोड नगरच्या मनात घर करुन आहे. याच रोडवर छाया टाॕकीज समोर सुंदर झाडी सुद्धा होती…!
नगरकरांनी या चितळेरोडवर दिलसे प्रेम केले…

या रोडवरुन फिरला नाही,असा नगरकर सापडणे केवळ अशक्यच!
काय बरोबर ना!
मनापासून प्रेम केले या चितळेरोडवर आम्ही!

अजून एक रोड म्हणजे नवा कापड बाजार!

या बाजारपेठ म्हणजे नगर ची शान आहे.!
तिथं मनापासून (दिलसे)केलेली खरेदी, लग्नासाठी बांधलेले बस्ते!
सारडा कोहीनूरला महाराष्ट्रभर मिळालेली प्रसिद्धी !
आपण यांच डोळ्यांनी बघितली आहे.!

खरंच त्या काळातील खरेदीचे दिवस आठवले की आजही मनात उत्साह भरतो!
दिलसे सांगतो!
मस्त होता आपला नवा कापडबाजार!….!

नगरचे नाटकप्रेम सर्वांनाच माहित आहे

!नाटकाचे नाव जरी काढले तरी मोने कला मंदिर,रंगभवन ही दोन नावे लगेच डोळ्यासमोर येतात.
मनापासून सांगतो या दोन्हीही मंचानीं त्या काळात नगरकरांची नाटकांची हौस भागवली होती.

दिलसे कहता हूँ!

*खचाखस भरलेली ही ओपन एअर थिएटर, *तल्लीन होऊन बघितलेली अजरामर नाटके* आजही मनाला आनंद देतात.

काहीही म्हणा !

मोने कला मंदिरची मजा काही औरच होती

सिनेमा,
आपल्या भाषेत पिक्चर!
चल!आज रात्री एखादा पिक्चर टाकू!
अरे पण हाऊसफुल असेल!
तू नको तिकीटांची काळजी करु!
आपलं सेटींग आहे!
या डायलाॕग मुळे
वसंत आशा चित्रा छाया सरोश या थेटरची लगेच आठवण होते….

दिलसे कहता हूँ!
आठवड्याला एक पिक्चर टाकायचो!

एकसे एक पिक्चर बघितले आहेत नगरमधे
ते ही मित्रां बरोबर!

नगरकरांच्या मनातील अजून एक गोष्ट म्हणजे माळीवाड्यातील महा गणपती!
प्रत्येक घरातील शुभ कार्याची सुरवात या गणेशाला वंदन करुन व आमंत्रित करुन होत असते

आहेत की नाही या आपल्या नगरमधील मनातील गोष्टी!

आपण आता सर्वांच्या आवडीच्या विषयाकडे वळू यात!

दोस्ती!

नगरची दोस्ती म्हणजे जीव की प्राण!

एकदा दोस्ती केली की ती शेवट पर्यत निभावणार!

सुख दुःख,
अडीअडचणी,
संकटं,
दुखणे खुपणे,
आजारपण,
हरवले सापडले,
लग्न कार्य,
फिरणे,प्रवास,
व्यवसाय,
व्यापार,
वाद विवाद,भांडणे,
आर्थिक व्यवहार,
पार्टनरशिप,
राजकारण,
समाजकारण,
करमणूक,
पार्ट्या,

इत्यादी बाबींमधे ही दोस्ती आपणास प्रत्येक गल्लीत दिसून येत असे.

तुम्हाला सांगतो!

नगरच्या या नात्यात काही खास असायचं हे मात्र नक्की!

एकमेकांवर भरभरून प्रेम करणे
जीवाला जीव देणे.
कायम एकमेकांच्या साथीमधे असणे
ही नगरच्या दोस्तीची खासियत!

ही दोस्ती आपणास शिक्षण,व्यवसाय,दूकानदारी,कारखानदारी, हाॕटेल,कौटुंबिक वाटचाल,मदतीचा हात, सांस्कृतिक कार्यक्रम,धार्मिक कार्यक्रम नाटक सिनेमा विविध प्रकारचे खेळ इत्यादी विषयात दिसून येत असे.

या दोस्तीमधे कधी कोणती भिंत अडवी आली नाही!

एकदा का,एकमेकांचे विचार जुळले की ही दोस्ती छान डेव्हलप होत असे….!

नगरमधे अशी किती तरी उदाहरणे आहेत की या दोस्तीच्या जोड्या खूप प्रसिद्ध होत्या…
या जोड्यांची नावे जरी घेतली तरी लोकांना हेवा वाटत असे…

आजही काही ठिकाणी पन्नासवर्षापूर्वीची दोस्ती टिकून आहे

ती फक्त एकमेकांवर केलेल्या प्रेमामुळे!

मला आठवते,काही दोस्त्या अशा होत्या की एक मित्र व्यवसायिक तर एक साधारण पण या दोघांत कधी अंतर पडले नाही.
कायम या दोघांनी एकमेकांना सावरुन घेतले! समजून घेतले!
या मित्राने वेळ प्रसंगी पदरमोड करुन, खिशाला चाट देऊन अडचणीत मदत केली आहे….!

आपल्या वागण्यातून या मंडळींनी
ही दोस्ती टिकवली होती!संभाळली होती!

मला आठवते या मैत्रीमधे दोघांपैकी एकाला जीवनात उभे रहायचे होते.
त्यामुळे मदत ही कायम केली जायची!

मी हे केले!
असा कधी बोभाटा सुद्धा केला नाही…!
अरे मी आहे ना!
कशाला काळजी करतो!
सब ठिक हो जाएगा!
असा आधार असायचा..!..

मला आठवते,या दोस्ती मधून अनेक व्यवसाय उभे राहीले आहेत..!
अनेक गरजू मित्रांना मदत झाली आहे..!..
या मैत्री मधून खूप काही शिकायला मिळाले!
असे अनेक जण आजही सांगतात!

तुम्हाला एकच उदाहरण सांगतो!
त्या काळात आपल्या मित्राच्या
घरी लग्न असले की हा मित्र आपला सर्व
काम धंदा सोडून लग्न घरी हजर होत असे,
पडेल ते काम प्रेमाने करीत असे,
नवरी मुलगी मार्गी लागली की,
हा मित्र शांतपणे घरी जात असे.

याला म्हणतात दोस्ती!

माझ्या अनुभवा नुसार या दोस्तीवर नगरमधे कधी जातपात,धर्म,गरीब,श्रीमंत असे शिक्के कधी मारले गेले नाही….!

एकदा मैत्री झाली की या सर्व भिंती आपोआप गळून पडत असत

ही दोस्ती,
सायकल वरुन फिरली,
स्कूटरवरुन फिरली,
मोटार सायकल वरुन फिरली,
एसटी मधून फिरली,
कधी चान्स मिळाला तर फियाट किंवा अँबेसॕडरमधून फिरली,
पायी पायी फिरली,
डबलसीट फिरली,टिबल शीट फिरली,
एकमेकांचे कपडे बूट चप्पल घालून फिरली!
मजा यायची!

या दोस्तीची घरच्यांना काळजी वाटायची!
अहो जरा बघा!
कुठे उंडारत असतो दिवस रात्र!
कोण मेला तो!
घरच्या लोकांपेक्षा त्याला जास्त महत्त्व!
जा बाबा तुझ्या घरी घेऊन याला!

अरे!तुला तो काय जन्मभर पुरणार आहे का?
स्वतः काही तरी करायला शिक!

आता हे संवाद आठवा!

अहो!xxxxच्या मित्राने xxxxलग्नात किती मदत केली नाही!

आपले सख्खे राबणार नाही,इतका तो राबला!
कमाल आहे बाई!
या दोस्तीची!

काका तुम्ही घरी जा!
मी आहे दवाखान्यात !
तुम्ही काळजी करु नका!

अरे! सकाळ पासून गायब आहे!
खूप शोधले सापडला नाही!
तुला कुठे सापडला!

असे नगर मधील मित्र व त्यांच्या बरोबरच्या आठवणी आजही आपल्या मनात कायम आहेत.
माझ्या सिनिअर मित्राने त्या काळातील काही दोस्तीचे किस्से सांगितले!

सेँट्रल बँक रोडवर दोघांची मैत्री होती.
काही कारणाने त्यांच्यात दुकानाच्या जागेवरुन वाद निर्माण झाला!
केस कोर्टात गेली.
तर हे दोघे मित्र कोर्टात केस लढवायला एकत्र जायचे…!नगरच्या दिवंगत खासदाराने आपल्या मुस्लीम जिवलग मित्राची सही निवडणूक अनुमोदन फाॕर्मवर घेतल्या शिवाय कधी निवडणुकीचा फाॕर्म भरला नाही…

याला म्हणतात दोस्ती!ही मैत्री बँकेत गेली की,तु मला जामीन रहा!
मी तुला जामीन रहातो!

अशी देवाण घेवाण कायम चालत असे

लग्नाला पैसे नव्हते,जवळच्या मित्राने मदत केल्यामुळे लग्न पार पडले….
काय पाहिजे ते घेऊन जा!
पैशाचे नंतर बघू!

एक जवळचा मित्र काही कारणाने पोलीस स्टेशनमधे अडकला,मित्राने खटपट करुन त्यांची ताबडतोब सुटका केली!

एका मित्राने हाॕटेल टाकण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या जवळच्या मित्राने रात्रं दिवस जागून हाॕटेल सुरु होई पर्यत त्याला मदत केली होती…!

एका मित्राने,आपल्या मित्राचा प्रेम विवाह आळंदीमधे लावून दिला,सर्व परिस्थिती निवळे पर्यत ती नवविवाहीत मुलगी मित्राच्या बायकोकडे राहीली होती.

मित्रा बरोबर केलेली नगर पुणे नगर स्कूटर ट्रिप कोण विसरेल!
हा स्कूटरचा प्रवास एकदम खास असायचा.!

मित्रांनो

असे एक नाही तर, अनेक किस्से या मैत्रीचे आहेत…

मला आठवते आती दोस्ती मुळे जसा फायदा झाला तसे नुकसान ही खूप होत असे….!

आज कितीही वर्षे झाली तरी या घटना काल घडल्या सारख्या आपल्या समोर येतात व नकळत आपले हात या दोस्ती साठी जोडले जातात…!

येssss दोस्ती हम नहीं छोडेंगे!
छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे!
हे गाणे हमखास आठवते.

एक मात्र खरे या दोस्तीने खूप काही शिकवले
हीच शिकवण पुढील आयुष्यात कामाला आली

चला आता आपण थोडे
दुनियादारीकडे वळू यात……..!

घरच्या भाकरी खायच्या व दिवसभर बाहेर भटकायचे!
यालाच लष्कराच्या भाकरी भाजणे असेही म्हटले जायचे
या फिरण्यात कधी अर्थ असायचा,तर कधी नुसतंच बोंबलत फिरायचे!
ना घरची काळजी! ना कुठली खंत!

नुसती दुनियादारी!

अरे बाबा ही दुनियादारी किती दिवस चालणार आहे तुझी!
जरा आमची पण काळजी कर!
सकाळी चहा घशात ओतला की नुसता मित्राबरोबर फिरत असतो!
अरे तुझ्या मित्राची दुकानदारी आहे!
तुझं काय!
दिवस रात्र त्याच्या गाडीवर फिरत असतो!
जरा लाज बाळग!
तुझे वडील आता रिटायरमेंटला आलेत!
काही तरी कर बाबा!

असे डायलाॕग कर्त्या मुलांच्या घरातून ऐकू येत असत!

ही दुनियादारी खास करुन इलेक्शनच्या वेळेस दिसत असे.
सकाळी एकदा बाहेर पडला की रात्री घरी येण्याचे भान नसायचे….

निवडणुकीचा निकाल लागल्यावरच हे महाशय घरी येतच नसत!

नगरमधे पूर्वी चौका चौकात गणेश मंडळं होती.
या मंडळाचे मेन कार्यकर्ते या दुनियादारीमधे दिसत असत.
रात्रंदिवस ही दुनियादारी मांडवात किंवा आजूबाजूला दिसत असे.

नगरच्या परिसरात कुठली ही घटना घडू द्या.
ही दुनियादारी तत्परतेने तिथे हजर होत असे!कधी कधी दुनियादारीची ही हजेरी अंगलट पण येत असे…

एक मात्र मान्य करावे लागेल की या दोस्ती दुनियादारीने नगरमधील अनेक मान्यवरांना इलेक्शन जिंकून दिली आहे.
मान सन्मान दिला आहे.
त्यांची कठीण कामे सोपी केली आहेत

या दिल दोस्ती दुनियादारीमुळेच नगरचा माणूस बेधडक,
बिनधास्त,
अॕक्टीव्ह,
न लाजणारा,
न बुजणारा,
न घाबरणारा,
भिडणारा,
बोलबचन
एनर्जटीक
असा तयार झाला आहे.

हा नगरचा माणूस कुठेही गेला तरी
नगरचा झेंडा फडकवणारच!

म्हणून नगर तिथे काय उणे
असे म्हणायला हरकत नाही!

मित्रांनो,
तुम्हीही दिल दोस्ती दुनियादारीचे आपले अनुभव शेअर करा!

माहिती सहकार्य – फिरोजभाई तांबटकर,धनेश बोगावत

विश्वास सोहोनी
9850995652
;

:

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी