माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी

माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी

आधुनिक केसरी न्यूज   

हनुमंत मस्तुद

माढा : विधानसभा मतदारसंघातील सीना नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या पिण्याचे पाणी, शेती सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. नदीपात्रातील पाणीसाठा कमालीचा घटल्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत माढा तालुक्यासाठी सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्राद्वारे व भेटीतून केली आहे.सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडल्यास नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर सुकत चाललेल्या पिकांना संजीवनी मिळणार असून, पशुपालकांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्नही मार्गी लागेल. माढा तालुक्यातील जनता, शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा हा पाठपुरावा सातत्याने सुरू असून, हा पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज   हनुमंत मस्तुद माढा : राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व...
माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी
राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!
कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ
लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना