तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी

तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असून, ही घटना आज तारीख 12 रोज मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तीरखुरी सहवन क्षेत्र भाग क्रमांक नऊ अंतर्गत नियत क्षेत्र क्रमांक तीन मधील भरनोली जंगल परिसरात घडली. चार दिवसात तिसरी गंभीर घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील काही मजूर नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास जंगलातील पत्ता संकलनासाठी गेले होते. सकाळी तेंदु पत्ता गोळा करण्याची काम सुरू असताना. दाड जंगल परिसरातून अचानक अस्वल बाहेर आले .आणि दीपक गावळे राहणार  भरनोली यांच्यावर हल्ला चढविला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला .अस्वलाने गावळे यांच्या मांडीवर व शरीराच्या इतर भागांमध्ये गंभीर जखमा केल्या .त्यांच्यासोबत असलेल्या इतर मजुरांनी आरडा ओरड केल्यामुळे जंगलाच्या दिशेने अस्वल पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत दीपक गावळे यांच्या सहकाऱ्यांनी जंगलाबाहेर आणून तातडीने उपचार करण्यासाठी केशोरी आरोग्य केंद्रात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच गोठनगाव वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. असून परिसरातील नागरिकांनी जंगलात जाताना सतर्क रहावे. एकटे जाऊ नये. तसेच वन्य प्राण्यांचा बाबत दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले. चार दिवसापासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत .त्यामुळे जंगल लगतच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नऊ मे रोजी बोंडगाव/ सुरबन परिसरात घटना घडली .वाघाच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. १० मे ला वडेगाव/ बंदया या ठिकाणी वाघाने एका वृद्ध महिलेचा बळी घेतला. आज ही तिसरी घटना झाल्यामुळे या तालुक्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या...
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 
आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी
विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित