साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 

सदा गँग व इतर गँगच्या सदस्यांवरही लवकरच संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई 

साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 

आधुनिक केसरी न्यूज 

बालाजी वैजळे 

नांदेड : संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत साईलाला गँगच्या १२ जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यात साईलाला टोळीच्या दोन मयत सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी साईलाला गँगच्या मुसक्या आवळल्या असून टोळीतील सर्व सदस्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे. दरम्यान शहरातील सर्व पोलिस प्रमुखांना गुन्हेगारी टोळ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असून लवकरच सदा गँगच्या सदस्यांसह इतर टोळीतील सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डी मार्ट परिसरात ४ एप्रिल रोजी साईलाला गँग व सदा गँग यांच्यात जुन्या वादातून रक्तरंजित टोळी युद्ध झाले होते. साईलाला गँगच्या मयत महंमद अरबाज महमंद फारुख व सय्यद अवेज सय्यद खलील व त्यांच्या साथीदारांनी साईलाला गँगचा अर्जितसिंग हा सिनेमा पाहुन आपल्या साथीदारांसह घराकडे जात असताना साईलाला गँगच्या सदस्यांनी अर्जितसिंग यांच्यावर तलवारी व खंजीराने हल्ला करुन अर्जितसिंग यास जागीच ठार केले होते.
डि मार्ट परिसरात झालेल्या या टोळी युद्धात साईलाला गँगचे सदस्य सय्यद अवेज सय्यद खलील व महंमद अरबाज महमंद फारुख हे ठार झाले होते. सदर घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली होती. गुन्हेगारी टोळ्यांच्या या हल्ल्यामुळे शहरात गुन्हेगारी कशी वाढली यांची चर्चा सुरु झाली होती. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सदर टोळीतील सर्व सदस्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे व गुन्हे शोध पथकांचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व नरेश वाडेवाले यांनी सर्व आरोपीला ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली होती. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने शहरातील पोलिस निरीक्षक यांची बैठक घेऊन त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व त्यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारी टोळ्या यांचा बिमोड करण्याची मोहीम आखली. सुधारण्याची संधी देऊन देखील वारंवार गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. साईलाला गँगच्या सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.‌ नांदेड शहरातील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वारंवार गुन्हे करणाऱ्यांना व न्यायालयात गुन्हे दाखल असलेल्या सर्व आरोपी विरोधात मकोका कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार साईलाला गँगच्या १२ सदस्यांच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करुन मकोका कारवाई करण्यात आली आहे. लवकरच सदा गँगच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करुन त्या टोळीच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील इतर टोळ्या व त्यांच्या सदस्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी केली आहे. 

१२ जणांविरुद्ध मकोका कारवाई
भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी साईलाला गँगच्या साईसिंग ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार, वय 26 वर्ष, रा.बालाजी मंदीर कमान जवळ, सिडको,  जयकुमार ऊर्फ सोनु कैलास राऊत, वय 23 वर्ष, मजुरी रा. सुमेध नगर, शाकेर खान रशीद खान, वय 30 वर्ष, व्यापार रा. मिल्लतनगर, शेख शाहरुख ऊर्फ कबुतर शेख अजगर, वय 29 वर्ष, बेकार रा. खुदबेनगर चौरस्ता, महेबुबीश कॉलनी, शेख उबेद शेख अजगर, वय 23 वर्ष, बेकार रा. फेमस फंक्शन हॉल जवळ मिल्लत नगर, दिग्वीजय गणेशराव नारागुडे, वय 22 वर्ष, खाजगी काम रा. सावीत्रीबाई फुले शाळेजवळ, शामनगर, मन्मत वसंतराव मंगरुळे, वय 25 वर्ष, पानशॉप रा. ग्री कॉलेजजवळ, लालवंडी रोड, ता. नायगाव, जि.   नितेश परमेश्वर इंगळे, वय 22 वर्ष, शिवनगर, हनुमान मंदीरजवळ,  गौरव दिपकसिंग गहरवार, वय 30 वर्ष, व्यापार रा. शक्तीनगर, नांदेड. सय्यद आवेज सय्यद खलील, वय 27 वर्ष, रा. खुदबेनगर चौरस्ता, (मयत)  महंमद अरबाज महंमद फारुख, वय 23 वर्ष रा. इदगाह मैदान, इतवारा, नांदेड (मयत),  इलियास ऊर्फ काला इल्तुखान ईस्माइलखान, रा. खुदबेनगर चौरस्ता, यांच्या विरोधात मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सदर प्रस्तावाची छाणणी करुन हा प्रस्ताव विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे दाखल करण्यात आला. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई  साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 
आधुनिक केसरी न्यूज  बालाजी वैजळे  नांदेड : संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत साईलाला गँगच्या १२ जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून...
आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी
विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 
जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना
ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त 
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!