तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 

तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : येथील खुन प्रकरणातील साई गँगचा मुख्य सुत्रधार तथा प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग चव्हाण खुन प्रकरणातील मुख्य आरोपी साई उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे जेरबंद करण्यात आले आहे. सदरील कारवाई वाराणसी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. आरोपी साईलाला ठाकुर यास अधिक चौकशीसाठी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डी मार्ट परिसरात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री सदा गँग व साईलाला गँग यांच्यात जून्या वादातून टोळी युद्ध भडकले होते. सदा गँगचा सदस्य असलेल्या प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग चव्हाण व त्यांचे सहकारी चित्रपट पाहून परत येत असताना साईलाला ठाकुर, सय्यद अवेज, महंमद अरबाज व त्यांच्या साथीदारांनी तलवारी व खंजीराने जोरदार हल्ला करुन प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग चव्हाण यास जागीच ठार केले होते. त्यांनतर या हल्ल्यात सय्यद अवेज, महंमद अरबाज यांचा खुन करण्यात आला होता. त्यावेळी भाग्यनगर पोलिस ठाण्यात सदा गँग व साईलाला गँग यांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन पोलिसांनी दोन्ही गँगच्या सदस्यांना अटक केली होती. साई उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार हा फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी पथकांची स्थापना करुन अटक करण्याचे आदेश दिले होते. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर आरोपीचा सोलापूर, नांदेड, पुणे येथे शोध घेतला मात्र त्यांचा माग लागला नव्हता पोलिस उपनिरीक्षक सुनिल भिसे यांना सदरील आरोपी हा वाराणसी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक सुनिल भिसे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक पोलिस उपनिरीक्षक सुनिल भिसे यांच्या नेतृत्वाखाली वाराणसीकडे रवाना झाले. सदर पथक हे वाराणसी येथे पोहचणार एवढ्यात साईलाला दिपकसिंह गहेरवार व त्यांचा सहकारी नितेश परमेश्वर इंगळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक सुनिल भिसे यांनी सदर माहिती वरिष्ठांना कळवून वाराणसी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून साई उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार व त्यांचा सहकारी नितेश परमेश्वर इंगळे यास अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदरील आरोपीला ताब्यात घेऊन नांदेड येथे परत आले. अधिक चौकशीसाठी आरोपी साई उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार व त्यांचा सहकारी नितेश परमेश्वर इंगळे यास भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक सुनिल भिसे व त्यांचे सहकारी ब्रम्हानंद लामतुरे, शिलराज ढवळे, प्रदिप गर्दनमारे, राजू बुंगई, व्यंकट गुंगलवार, हेमंत बिचकेवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक  तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : येथील खुन प्रकरणातील साई गँगचा मुख्य सुत्रधार तथा प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग चव्हाण खुन प्रकरणातील मुख्य...
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे
चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश