सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 

सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : लोहा तालुक्यातील परसराम तांडा येथे सोलार लाईटच्या खांबावर शाॅट सर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली असून तांड्यावरील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कडबा व गावकरी मंडळीचे जळतन जळून गेले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान सदरील सोलार विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर वारंवार शाॅट सर्किट होऊन आग लागत असल्यामुळे तांड्यावरील नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील परसराम तांडा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने उमरा व धनज खु येथील गायरान जमीनीवर मोठा सोलार प्रकल्प उभा करण्यात आला आहे. सदर सोलार प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कापसी बु येथील ३३ केव्ही स्टेशन येथे पुरवठा करण्यात येत आहे. त्या प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. 
परसराम तांडा येथून कापसी बु येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मोठा शाॅट सर्किट झाला. त्यामुळे जमीनीवरील गवताने पेट घेतला. ही आग पाहता पाहता परसराम तांडा परिसरातील तांड्याचे शेजारी येऊन पोहचली. सदरील आग ही तांड्यात पोहचणार असे वाटत असतांना गावातील जागरूक तरुणांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला फोन करुन अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत गावकरी मंडळीनी आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न करत आग रोखून धरली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान येऊन तांड्याचे शेजारी लागलेली आग आटोक्यात आणली. 
परसराम तांडा येथे लागलेल्या आगीत राजीव भावसिंग राठोड, रमेश पांडू राठोड, मधूकर पांडू पवार यांचा कडबा जळून खाक झाला आहे. तसेच गोविंद मारोती राठोड, वसंत रामसिंग राठोड, देविदास किशन रठोड, अविनाश बाबाराव चव्हाण यांचे जळतन जळून गेले आहे. परसराम तांडा येथील सोलार प्रकल्पातून निर्माण होणारा विद्युत पुरवठा कापसी बु येथील ३३ केव्ही स्टेशन येथे जात आहे. सदर सोलार प्रकल्पाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर वारंवार शाॅट सर्किट होत आहे. त्यामुळे तांड्यावरील नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारंवार होणारी आगीच्या घटनांवर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी तांड्यावरील नागरीकांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव  सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील परसराम तांडा येथे सोलार लाईटच्या खांबावर शाॅट सर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली...
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट