शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

जनार्दन चव्हाण

आडगाव : रेपाळ ता.येवला येथील तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत योगेश घमाजी महाले यांनी दिलेल्या खबरीत, त्याचा चुलत भाऊ गणेश वाळुबा महाले वय - ४६ वर्ष रा.आडगाव रेपाळ हा दि.१९ मार्च रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण करुन घरातुन निघुन गेला तो रात्री घरी आला नाही म्हणुन, आम्ही दि.२० मार्च रोजी पहाटे गावात तसेच मळ्यात शोध घेतला असता त्याच्या पायातील चप्पल मयताच्या आडगाव रेपाळ शिवारातील शेत गट नं २४ मधील शेततळ्यात दिसुन आल्याने आम्ही सर्व नातेवाईकांनी शेततळ्यामध्ये उतरुन बघितले असता माझा चुलत भाऊ गणेश महाले हा शेततळ्यातील पाण्यात मिळून आला. त्यास औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय, येवला येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषित केले आहे. त्यांचे खबरीवरून येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ए.एस.आय सुनील पवार करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  जनार्दन चव्हाण आडगाव : रेपाळ ता.येवला येथील तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...
ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील 
मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान 
श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 
मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले