मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 

चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यापार्यांला नांदेड येथे हलविले 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दिवसाढवळ्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन एका व्यापाऱ्याला चोरट्यांनी जबर मारहाण करुन १० हजार रुपये पळविले आहे. मारतळा येथे मंगळवारी बाजार असताना ही घडल्यामुळे खळबळ माजली आहे. सदर व्यापार्यांनी उस्माननगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. वैद्यकीय उपचारासाठी जखमी व्यापारी माधव गोविंदराव उबाळे यास वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. 
याबाबतची सविस्तर माहिती अशी नांदेड तालुक्यातील गाडेगाव येथील माधव गोविंदराव उबाळे यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी शेतीचे औजारे विक्रीचे दुकान टाकले आहे. व्यापारी माधव गोविंदराव उबाळे हे दुपारी चार वाजता लघुशंका करण्यासाठी दुकानाबाहेर पडले असता अज्ञात दोन ते तीन जण मोटारसायकल वरून आले. त्यांच्या जवळ असलेले गुंगीचे औषध माधव उबाळे यांच्या तोंडावर फवारले. त्यावेळी माधव उबाळे यांना काही कळत नसल्यामुळे तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करुन त्यांच्या खिशातील १० हजार रुपये काढून घेतले. या मारहाणीत माधव गोविंदराव उबाळे हे गंभीर जखमी झाले. त्यावेळी बाजारात उपस्थित असलेले नागरिक धावत आले. त्यामुळे सदर व्यापारी यांचे प्राण वाचले. मंगळवार रोजी मारतळा येथे मोठा आठवडी बाजार भरतो आठवडी बाजाराच्या दिवशी मामा मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. सदर घटनेमुळे मारतळा येथे दहशतीचे वातावरण पसरले असून व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सदरील घटना ही जखमी माधव गोविंदराव उबाळे यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी मारतळा येथे धाव घेतली. जखमी अवस्थेत त्यांनी मारतळा येथील असलेल्या ठिकाणी धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बु येथे पाठवून दिले. कापसी बु येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविले आहे. जखमी मा़धव गोविंदराव उबाळे हे जखमी अवस्थेत उस्माननगर पोलिस ठाण्यात गेले असून उस्मान नगर पोलिस याबाबत काय चौकशी करणार व आरोपीला पकडणार का असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले  मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दिवसाढवळ्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन एका व्यापाऱ्याला चोरट्यांनी जबर मारहाण करुन...
“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त