शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 

शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 

आधुनिक केसरी न्यूज 

कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले. शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अभियानांतर्गत चंदगड ते कोल्हापूर निघालेली शिक्षण हक्क यात्रा राधानगरी येथे आली. येथील अंबाबाई मंदिरापासून  रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गोकुळ संचालक व जि. प. सदस्य अभिजीत तायशेटे यांनी १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे शाळातील शिक्षकांची संख्या कमी होणार असून त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला बगल दिली जाणार असल्याचे म्हणाले. यावेळी हिंदुराव चौगले,जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे,  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी शिक्षक नेते विजय देवणे,सुनिल शिंत्रे अभिजित तायशेटे, वसंतराव पाटील,, आर. वाय पाटील,शरद पाडळकर, सुरेश बचाटे, विश्वास राऊत,बडोपंत किरुळकर,शिक्षक समितीचे प्रमोद तौदकर, मधुकर मुसळे, एन. डी. आयरे, शाहू चौगले, प्रकाश कानकेकर, मंगेश धनवडे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर  शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
आधुनिक केसरी न्यूज  कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या...
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड 
कारगिल चौकातील अपघाताने गडचिरोली हादरले; “आधी नागरिक गेले, आज आरोग्य सभापती” : नगरपरिषदेसाठी इशार्‍याची घंटा