अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर नैनपुर डुगीपार जवळील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, अग्रवाल ग्लोबल कंपनीने उभारलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या आरीवालजवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दीड ते दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने तसेच दुग्गीपार पोलिस ठाण्याचे थानेदार गणेश वनारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व पोलिस विभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले.
सदर महामार्गावर वन्यप्राण्यांच्या वावराबाबत यापूर्वीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. वाढत्या वाहनांच्या वेगामुळे वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाई वनविभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे विशेष

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकाचा जिवंतपणी सन्मान का नाही ? शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकाचा जिवंतपणी सन्मान का नाही ?
आधुनिक केसरी न्यूज   वरोडा : "सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतो, म्हणूनच देशवासीय सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतात. मात्र,...
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
गडचिरोली,कोरची येथे भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला जबर धडक
भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात जाताच तरुणीचा खळबळजनक खुलासा
आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीत सुधारणा सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, चंद्रपूर 
नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद; केळीच्या बागेत मजुरांवर केला होता हल्ल्याचा प्रयत्न