जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र माहीत होता. अजितदादांचा अभ्यास अतिशय दांडगा असल्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणावर पकड होती. जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच पुढे येऊन मदत केली आहे. वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर असायचे. कार्यालयीन कामकाज असो विधिमंडळातील भाषणे असो की सार्वजनिक व्यासपीठावर केलेले मार्गदर्शन असो, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व झळकत होते. अशा या उमद्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. ही राज्याचीच नव्हे तर देशाची अपरिमित हानी आहे. मंत्रिमंडळातील माझे सहकारी गमावल्याचे अतिशय दुःख आहे. दादांना विनम्र श्रद्धांजली..!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List