बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण

बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : दि. 14 जानेवारी 2026 आज रात्री सुमारे 8.40 वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली कॅम्पमधील अपक्ष उमेदवार अजय सरकार याने भाजपच्या महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला कार्यकर्ती ऑटोमध्ये बसलेली असताना अजय सरकार याने तिच्या साळीला व केसांना धरून जबरदस्तीने तिला ऑटोमधून बाहेर ओढले. यानंतर रस्त्यावरच तिच्यासोबत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महिला कार्यकर्ती जखमी झाली असून तिला तत्काळ शासकीय दवाखान्यातील आपत्कालीन (इमर्जन्सी) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे बंगाली कॅम्प परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अजय सरकार यांच्या कथित गुंडगिरीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “बंगाली कॅम्पची जनता अखेर किती दिवस ही दादागिरी सहन करणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच महिला कार्यकर्तीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..! वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : होळीच्या आनंदमयी सणाला दुःखाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. आरमोरी येथील गायकवाड चौक...
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी