भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी

भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी

आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

भिगवण : राशीन रोडवर राजपुरे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि.१३ जानेवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (वय ३८, रा. काञज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्विफ्ट कारमधील विजय हनुमंत शिंदे (वय ३८) व दादासो सर्जेराव डुबे (वय ३५, दोघे रा. काञज, ता. करमाळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह असलेल्या ट्रॅक्टर (एम. एच. ४५. एफ. ३०२५) आणि स्विफ्ट कार (एम. एच. १२. के.वाय. १६१५) राजपुरे पेट्रोलपंपाजवळ जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारचा मोठ्या प्रमाणावर चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतुल गजरमल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : राशीन रोडवर राजपुरे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि.१३ जानेवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व...
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या चंद्रपूरात