६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली

६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली

आधुनिक केसरी न्यूज

जनार्दन चव्हाण

निफाड : देवगाव परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री देवगाव येथील किशोर दत्तु बोचरे यांच्या गट क्रमांक ८०/२ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे सहा वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन किलोमीटरच्या परिघात गेल्या ६३ दिवसांत सहावा बिबट्या पकडण्यात आल्याने परिसरातील दहशत आणखी वाढली आहे.

बुधवारी (८ जानेवारी) लगतच्याच क्षेत्रात एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही घटनांची मालिका सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाढत्या बिबट्यांच्या हालचाली लक्षात घेता देवगाव, महादेवनगर, वाकद, शिरवाडे, कानळद, रुई, धानोरे व कोळगाव ही गावे संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पकडलेल्या बिबट्याला चार तास रोखून धरले.यावेळी येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बिबट्याला म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात सुरक्षितरीत्या हलविण्यात आले.

या प्रसंगी उपसरपंच लहानु मेमाणे, मनोहर बोचरे, किशोर बोचरे, भागवत बोचरे, धनंजय जोशी, राजेंद्र मेमाणे, पोलीस पाटील सुनील बोचरे, संदीप बोचरे, नागेश्वर बोचरे, गोपीनाथ मेमाणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे तसेच निफाडच्या आधुनिक पथकातील भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक आदींनी संयुक्त कारवाई करत बिबट्याला ताब्यात घेऊन म्हसरूळ येथे हलविले.

बिबट्याच्या हल्ल्यांनी भीती वाढली

परिसरात बिबट्याने संदीप बोचरे व सचिन बोचरे यांच्या वासरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला असून पाळीव कुत्र्यांनाही ठार केले आहे. शिवाजी पवार यांच्या घराच्या ओट्यावर तब्बल तासभर बिबट्याने ठाण मांडल्याची घटना घडली. तसेच कानळद रस्त्यावरील सोमनाथ कदम यांच्या शेळीच्या कळपावर हल्ला करून एक शेळी घेऊन बिबट्या पसार झाला. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : राशीन रोडवर राजपुरे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि.१३ जानेवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व...
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या चंद्रपूरात