मुबंईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण  अपघात; सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लागल्या किलोमीटरपर्यंत रांगा

मुबंईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण  अपघात; सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लागल्या किलोमीटरपर्यंत रांगा

आधुनिक केसरी न्यूज

महेश गायकवाड  

सोलापूर : महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात झाला; यामुळे वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा होत्या. मुंबईवरून हैदराबादकडे जात असलेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण अपघात झाला. सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे ही घटना घडली आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक एनएल ०१ बी १८६९) सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला. अपघातात खासगी ट्रॅव्हलचा बसचालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.

या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने या अपघातातील खासगी ट्रॅव्हल बस वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात खासगी ट्रॅव्हल्स चालक किरकोळ जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी  सुयश मीडिया ग्रुप शी बोलताना दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.12 जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती...
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई