शासकीय कृषी तंत्र विद्यालय जळगाव जिल्हा क्रीडा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
फकिरचंद पाटील
जळगाव : दि.३०/१२/२०२५ रोजी जिल्हा क्रीडा निवड चाचणी स्पर्धेत कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, रनिंग, लांब उडी, उंच उडी घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे शब्द सुमनांनी स्वागत व सूत्रसंचालन कैलास महाले यांनी केले तसेच प्रास्ताविक डॉ. योगेश्वर जी .पाटील प्राचार्य, शासकीय कृषी तंत्र विद्यालय, जळगाव यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक दहात, प्रमुख शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव तसेच उद्घाटक डॉ. संदीप पाटील सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अरुण भोसले प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र जळगाव, डॉ. भानुदास गमे सहयोगी प्राध्यापक, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव, डॉ. सुमेरसिंग राजपूत प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, ममुराबाद आणि डॉ. गणेश देशमुख सहयोगी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर तसेच सर्व जिल्ह्यातील संलग्न कृषी तंत्र विद्यालयांचे प्राचार्य, पंच उपस्थित होते, यात जळगाव जिल्ह्यातील चौदा कृषी तंत्र विद्यालयातून कबड्डी हॉलीबॉल खो-खो रनिंग या संघातील खेळाडूंची निवड करण्यात येऊन सदर संघ विद्यापीठ स्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जाणार आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फकीरचंद पाटील प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, कोल्हे यांनी केले व खेळी मेळीच्या वातावरणात स्पर्धा घेण्यात आल्यात.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List