वारांच्या वार प्रतिवारामध्ये वारांचा वारांनाच आशीर्वाद
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : मुनगंटीवार जोरगेवार वाद हा आता केवळ चंद्रपूर पुरता मर्यादित राहिला नसून तो सबंध महाराष्ट्राला परिचित झालेला आहे. अशा या मुनगंटीवार आणि जोरगेवार या वारांच्या वार प्रतिवारांमध्ये नुकत्याच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये वारांचा वारांनाच शुभाशीर्वाद मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे. आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी देण्यात येणार नाही असा मोठा निर्णय भारतीय जनता पार्टी द्वारे घेण्यात आला आहे. त्या निर्णयाचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत असताना एकाच परिवारामध्ये दोन लोकांना उमेदवारी देण्यात येऊ नये हाही निर्णय घेण्यात आल्याचे सर्वत्र बोलल्या जात होते. या निर्णयाला फाटा देत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये वारांच्या वार प्रतिवारामध्ये वारांवरच आशीर्वादाचा हात देत माजी महापौर राखी कंचर्लावार आणि त्यांचे पती संजय कंचर्लावार अशा एकाच घरातील दोन लोकांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत काही निर्णय पक्ष पातळीवर घेण्यात आले आहेत या घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमध्ये राखी कंचर्लावार आणि त्यांचे पती संजय कंचर्लावार अशा दोघांनाही उमेदवारी दिलेली असल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. पक्षपातळीवर काही चांगले निर्णय होत असले तरी अखेर वारांनी वारांनाच शुभाशीर्वाद दिल्यामुळे सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच केवळ सतरंज्या उचलण्याच्या कामाचा असतो हा संदेश यातून गेलेला आहे असे आता सर्वत्र बोलल्या जात आहे. एकाच कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर त्या ठिकाणी दुसऱ्या एका एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळाली असती. परंतु भाजपाने ही संधी गमावली असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतो आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List