लोह्यातील तीन दुकानास लागली आग; आगीत लाखोचे नुकसान
आधुनिक केसरी न्यूज
लोहा : शहरातील नांदेड - लातूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक वजन काटा समोरील पत्राशेड दुकान गाळ्याला आग लागून जवळपास तीन दुकानांतील लाखों रुपयांचे नुकसान झाले. सदरील घटना दि. २९ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. लोहा, कंधार, अहमदपूर व नांदेड येथील अग्निशमन वाहनाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदर घटनेप्रकरणी महावितरण कंपनी सह तहसील कार्यालय कडून पंचनामा करण्यात आला.
लोहा शहरातील स्मशानभूमी पासून कांहीं अंतरावरील मुख्य मार्गालगत असलेल्या कलावती वजन काटा समोरील टिन शेड मध्ये विविध प्रकारच्या दुकान गाळ्यांना दि. २९ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिकांच्या निदर्शनास येण्यापूर्वी आगीने रौद्ररूप धारण केले. सदर आगीच्या भक्ष्यस्थानी एकूण तीन दुकाने पडली. आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील अनेकांनी प्रयत्न केले तसेच लोहा अहमदपूर, नांदेड व कंधार येथील अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले होते. मात्र कंधार पालिकेचे अग्निशमन वाहन घटनास्थळीच तांत्रिक बिघाड आल्याने बंद पडले. अग्निशन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. नूतन नगाराध्यक्ष शरद पवार यांनी विशेष प्रयत्न केले. सदरील आगीत सतीश शेटे यांच्या इंद्राणी हार्डवेअरचे जवळपास ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले दुकानातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. परमेश्वर हातागळे यांच्या वैष्णवी बॉडी बिल्डर दुकानातील मशीन जाळल्याने ३ लाख पन्नास हजाराचे तर रविशंकर वते यांच्या फॅब्रिकेशनचे ३ लाख रुपयांचे दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सदर घटना शॉट सर्किट मुळे झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. सदरील घटनेप्रकरणी महावितरण व तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List