आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 25 कोटी रुपयांच्या निधीला मिळाली मंजुरी
On
आधुनिक केसरी न्यूज
भद्रावती वरोडा : विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण तडफदार आमदार करण देवतळे यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत ₹२५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून टेमुर्डा – आसाळा – भटाळा – खेमजई – शेगाव या मार्गावरील डांबरी रस्त्याच्या कामास अधिकृत मंजुरी मिळाली असून, परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल भद्रावती वरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
या रस्त्यांच्या बांधकामामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हा मार्ग अतिशय सोयीस्कर असा होणार आहे हे विशेष.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
27 Dec 2025 09:34:59
आधुनिक केसरी न्यूज भद्रावती वरोडा : विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण तडफदार आमदार करण देवतळे यांच्या विशेष प्रयत्नातून...

Comment List