नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन 

नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन 

आधुनिक केसरी न्यूज

दिपक सुरोसे

शेगांव दि.२५ श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावला गुरुवार, शनिवार,व रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुट्टी तसेच दिवाळी सारखी नाताळ सणानिमित्त मुंबई पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेसला असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी उसळली आहे. दरवर्षी शेगावला नाताळमध्ये श्रींचे दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणावर असतो. श्रींचे दर्शन तसेच आनंद सागर या आध्यात्मिक केंद्राचे अवलोकन करण्यासाठी शेगावला हे भाविक येतात. शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या, एस टी बसेसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडताना दिसतात. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रींचे दर्शनासाठी भाविकांना सरासरी तीन तास व श्रीमुख दर्शनासाठी ४० मिनिटे अवधी लागत आहे. श्री संस्थानकडून भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी १० ते  ५ पर्यंत महाप्रसाद हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे  मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था वारकरी निवास, भक्त निवास विसावा , विहार या ठिकाणी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे भक्तांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री संस्थानकडून घेतली जात आहे.
श्री संस्थांनचे पाकिगमघ्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असल्याचे दिसून येत आहे .तर मंदिर परिसरात व  खाजगी पाकिग सुद्धा हाऊस फुल झाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन  नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन 
आधुनिक केसरी न्यूज दिपक सुरोसे शेगांव दि.२५ श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावला गुरुवार,...
प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूक विषयक जाहिरातींना बंदी,राज्य निवडणूक आयुक्त
गोंदियात मोठी कारवाई: मध्य प्रदेशातून दारूची तस्करी रोखली, आरोपी फरार 
रिसोड नगर परिषदेवर अनंतराव देशमुख यांचे “वर्चेस्व” कायम
गोंदिया,गोरेगाव, सालेकसात काँग्रेसचा तिरोड्यात भाजपाचा नगराध्यक्ष 
चंद्रपूर जिल्ह्यात मतदारांनी भाजपला नाकारले काँग्रेसला दिला हात
चंद्रपूर  जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर