सोलापूर किडनी रॅकेट प्रकरण! किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात खरेदी केल्यात मोक्याच्या ठिकाणी ५५ एकर जागा
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : मधील एकाने विदर्भातील अनेक लोकांच्या किडनी विकल्या असल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या किडनी रॅकेट मधून सुंचू याने किडनी रॅकेट मधून करोडो ची माया कमविले असल्याचे उघड झाले आहे. किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात ५५ एकर जमीन मोक्याच्या ठिकाणी खरेदी केली आहे.
इतकेच नाही तर सुंचू याने सोलापुरात मोठ मोठी प्रॉपर्टी कमवून ती नातेवाईक आणि पत्नीच्या नावाने इतर राज्यात तेलंगणा आंध्रप्रदेश येथे जमा केले असल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आले आहे.
किडनी रॅकेटमधील एजंट रामकृष्ण सुंचू याने सोलापुरातील मोक्याच्या ठिकाणी तब्बल २५ एकर जागा खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुंचू याच्या जवळच्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या किडनी विक्री प्रकरणात सुंचू सध्या अटकेत आहे. धार्मिक कार्यक्रम, रोख देणग्या, व्हीआयपी जीवनशैली आणि संशयास्पद कागदपत्रांमुळे सोलापुरात सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. हैदराबाद येथे नोकरी- व्यवसायानिमित्त गेलेला सुंचू दहा वर्षांपूर्वी सोलापुरात आला. सुंचू आणि त्याच्या नातेवाइकांच्या नावे तो राहात असलेल्या प्रियदर्शनी नगरातील बंगल्यासह १५ ते २० प्लॉट/घरे (अंदाजे दोन कोटी रुपये), तसेच अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ तीन एकर जागा (अंदाजे तीन कोटी रुपये) आहे. याशिवाय, जुने विडी घरकुल परिसरातील जय संतोषी माता गोशाळा ते आसाराम बापू मठ परिसरात त्याने २० एकर जमीन खरेदी केल्याची माहिती नव्याने पुढे आली आहे. या जमिनीची अंदाजे किंमत १५ कोटी रुपये आहे. जुने विडी घरकुल येथील एका प्रसिद्ध मंदिराचे अध्यक्ष असलेल्या इस्टेट एजंटामार्फत ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली.
प्रवचनाला ट्रस्टचे नाव देण्याची अट
पुढील वर्षी सोलापुरात होणाऱ्या चागंटी कोटेश्वरराव महाराज यांच्या प्रवचनाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी सुंचूने दर्शवली होती. मात्र, या प्रवचनाला 'वैष्णवी देवी मंदिर ट्रस्ट' हे नाव देण्याची अट त्याने घातल्याने, हे प्रवचन पारंपरिक आयोजकांमार्फतच होणार असल्याची माहिती मिळाली.
प्रवचनासाठी २० लाखांचा ॲडव्हान्स
२०१७ मध्ये रामकृष्णने देवकीनंदन ठाकूर यांचे प्रवचन सोलापुरात आयोजित केले होते. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च आला. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सुंचू याने नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध देवकीनंदन ठाकूर यांच्या प्रवचनाचे पुन्हा आयोजन केले आहे. त्यासाठी २० लाख रुपये देऊन प्रवचन बुक केल्याचे सांगण्यात आले.
रोख देणग्यांचा पाऊस
जुने विडी घरकुल येथील वैष्णवी देवी मंदिराचे बांधकाम, तमिळनाडूतील महाबलिपुरम येथून मूर्ती, पितळी धातूचे ध्वजस्तंभ, मूर्ती प्रतिष्ठापना व मिरवणूक हा सर्व जवळपास एक कोटीचा खर्च रामकृष्णनेच केल्याचे समजते. या प्रत्येक कामासाठी त्याने रोख पैसा खर्च केला आहे. तसेच, अशोक चौक येथील साईबाबा मंदिर परिसरातील यल्लमा देवी मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि ५०० साड्यांच्या वाटपासाठी त्याने रोख सुमारे पाच लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे.
इतकेच नव्हे तर सोलापूर मध्ये अनेक मंडळांना त्याने करोडो रुपयांची देणगी दिली असून अनेक मंडळांना आणि पोलिसांना हफ्ते देत त्याने दिवाळी सणात आणि त्याच्या बायकोच्या वाढदिवसाला कोट्यवधी रुपयांची उधळण केली असल्याचे उघडकीस आले आहे.
सुंचू याची सोलापूर मध्ये करोडो ची मालमत्ता
सोलापूर मध्ये आणि आंध्रप्रदेश तेलंगणा येथे सुंचू याने करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली असून यात. करोडो रुपयांच्या शेत जमिनी आणि प्लॉट व सुसज्ज बंगले आणि बँका मध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी असल्याचे उघडकीस आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List