सिंदखेडराजा नगरपरिषद निकाल जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचा नगराध्यक्ष पदावर निर्णायक विजय १५८ मतांनी सौरभ विजय तायडे विजयी
आधुनिक केसरी न्यूज
बाळासाहेब भोसले
सिंदखेडराजा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज सिंदखेडराजा नगरपरिषदेचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने नगराध्यक्ष पदावर वर्चस्व सिद्ध करत विजय संपादन केला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार सौरभ विजय तायडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत १५८ मतांच्या निर्णायक फरकाने नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातली.
ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, मतमोजणीदरम्यान चढ-उतार पाहायला मिळाले. अखेरच्या फेरीत सौरभ तायडे यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय निश्चित केला. या विजयानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
नगरपरिषद सदस्यांच्या निकालानुसार सत्तासमीकरण अत्यंत नाजूक व महत्त्वाचे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट + भाजप) यांना प्रत्येकी ७ जागा, तर शिवसेना (शिंदे सेना) गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष पदावर मिळालेला विजय शरद पवार गटासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
नगराध्यक्ष
सौरभ विजय तायडे
(राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार)
१५८ मतांनी विजयी
---
📍 प्रभागनिहाय निवडून आलेले नगरसेवक
प्रभाग 1 :
श्रेया उमेश खरात (राष्ट्रवादी काँग्रेस)
संतोष प्रकाश मेहेत्रे (भाजप)
प्रभाग 2 :
कैलास नारायण मेहेत्रे (शिवसेना – शिंदे सेना)
सोनाली गजानन मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
प्रभाग 3 :
निलेश देविदास ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
सिंधू जगन ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
प्रभाग 4 :
पूजा मंगेश खुरपे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
आवेश खान नाजीम खान (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 5 :
संगीता किशोर म्हस्के (शिवसेना – शिंदे सेना)
कैलास नागोराव म्हस्के (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 6 :
जासमीन अजीम तांबोळी (राष्ट्रवादी काँग्रेस)
खान हाजेरा नुजहत फारूक अली खान (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग 7 :
गौतम प्रकाश खरात (शिवसेना – शिंदे सेना)
अंबिका कैलास कोरडे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
प्रभाग 8 :
पोर्णिमा ओम भुसारे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
कृष्णा माणिक मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
प्रभाग 9 :
पुष्पा रामदास बारवकर (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार)
लक्ष्मण भगवान आढाव (शिवसेना – शिंदे सेना)
प्रभाग 10 :
दिपाली योगेश मस्के (शिवसेना – शिंदे सेना)
संदीप सखाराम मेहेत्रे (शिवसेना – शिंदे सेना)
एकूण पक्षनिहाय जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट + भाजप) : ७
शिवसेना (शिंदे सेना) : ६ नगराध्यक्ष पदावर मिळालेल्या विजयामुळे शरद पवार गटाला नगरपरिषदेत निर्णायक भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. नव्या नगराध्यक्षांकडून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा व शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
निवडणूक निकालानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी मतदारांचे आभार मानत, “सिंदखेडराजा शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करू. पक्षभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,” असे मत व्यक्त केले.या निकालामुळे आगामी काळात सिंदखेडराजा शहरातील राजकीय घडामोडींना वेग येणार असून, नगरपरिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात विविध हालचालींना सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List