“महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनाचे मंत्री सावेंच्या हस्ते थाटात उदघाटन

उद्योग, रोजगार निर्मितीसाठी गुंतवणूकदारांनी एकत्रित या; मंत्री अतुल सावे यांचे व्यापारी,उद्योजकांना आवाहन

“महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनाचे मंत्री सावेंच्या हस्ते थाटात उदघाटन

आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : दि.१९ डी एम आय सी मध्ये ५२ हजार करोड ची गुंतवणूक आगामी काळात होत आहे. ईव्ही हब म्हणून छत्रपती संभाजीनरची ओळख जगभरात निर्माण होत असल्याचा विश्वास व्यक्त करत उद्योग, रोजगार निर्मितीसाठी गुंतवणूकदारांनी एकत्रित या असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी (दि. १९) केले. 

१९ ते २२ डिसेंबर दरम्यान सेव्हन हिल येथील एसएफएस स्कूल च्या विस्तीर्ण प्रांगणात सकाळी १० ते रात्री ९ वाजेदरम्यान महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, जालना जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने आर आर केबल प्रस्तुत भव्य "महाराष्ट्र ट्रेड फेअर २०२५" चे उदघाटन मंत्री अतुल सावेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आर आर केबल चे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र काबरा तर विशेष अतिथी म्हणून विख्यात उद्योजिका तसेच समाजसेविका भगवती बलदवा, महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, दक्षिनांचल महासभेचे उपसभापती अरुण भांगडिया, संयुक्त मंत्री जुगलकिशोर लोहिया, दैनिक सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे, जालना येथील आयकॉन स्टीलचे कांतीलाल राठी, मनीष राठी, नीरज झंवर, जितेंद्र बियाणी, अलोक मुंदडा, माहेश्वरी सभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा, योगेश बजाज, युवा संघटनचे अध्यक्ष भूषण मालपाणी, दीपक तोष्णीवाल, मनीष राठी, श्यामसुंदर सोमाणी, विनीत तोष्णीवाल, भिकमचंद मल सह आदींची उपस्थिती होती. यावेळी महेशपूजन करण्यात आले. 

पुढे बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, मोठ मोठ्या प्रोजेक्टने आपल्या शहरात गुंतवणूक केली आहे. ऑरिक सिटीत देखील मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. त्यामुळे जवळपास ६० हजार ते ७० हजार उद्योजकांना नोकरी मिळतील. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे आपले एकमेव शहर असेल. तसेच पेट्रोल, डिझेल याची बचत करण्यासाठी इव्हेकलचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे शहर नक्कीच ईव्ही हब होईल. यामुळे शहराचा विकास होईल. आणि आजचे महाराष्ट्र ट्रेड फेअर प्रदर्शनासाठी उत्तम ठिकाण निवडले आहे. उद्योजकांना यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

सामाजिक भावनेतून समाजातील युवक-युवतींच्या स्वावलंबासाठी आणि महिला सक्षमीकरणा सह नवे उद्योजक घडविण्यासाठी आयोजित या भव्य "महाराष्ट्र ट्रेड फेअर-२०२५" प्रदर्शनात बोलतांना माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी सांगितले की, मेक ईन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना ठेवली आहे. त्या अंतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. यावेळी समाजसेविका भगवती बलदवा यांनी सांगितले की, जन सामान्यात आपल्याला ऐक नवी क्रांती घडवावी लागेल. युवकांच्या विकासाची गोष्ट केली तर युवक नक्किच सहभागी होतील. विदेशी ब्रँड जे डोक्यात भरले आहेत ते जर काढायचे असेल तर नव्या युवा उद्योजकांना पुढे करावे लागेल. देशभक्ती केवळ सीमा रेषेवर किंवा देशात नाही होत.... तर आपल्या देशातील उद्योग, व्यापाराला चालणा देऊनही होते. असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना केला. यावेळी  आर आर केबल चे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र काबरा, महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रकल्प प्रमुख तथा प्रदेश सभेचे मंत्री सत्यनारायण सारडा यांनी प्रास्तविक केले. यावेळी उदघाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखा राठी, नंदकिशोर मालपाणी यांनी केले. 

तज्ञांनी केले उद्योग, व्यापार मार्गदर्शन

स्वर्गीय डॉ. रामगोपाल चीतलांगे सभागृहात “महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनातील आयोजित प्रथम कार्यशाळेत दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान “उद्योजकता आणि कौटुंबिक व्यवसाय का? भांडवल कसे उभारायचे” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी नाशिक येथील उद्योगवर्धिनी चे अध्यक्ष तथा तज्ञ सुनील चांडक, पुणे येथील डॉ. रवींद्र मिनियार, उद्योजक डॉ. डीगंबर झंवर, अनिश माहेश्वरी यांनी उपस्थित उद्योजक व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

प्रदर्शनानिमित्त समाजाभिमुख उपक्रम

माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित या भव्य “महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनामध्ये विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये रक्तदान शिबीर, संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर, विविध मार्गदर्शनपर कार्यशाळा तसेच अध्यात्माला जोडून सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले आहे. या माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित या भव्य “महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनामध्ये समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रकल्प प्रमुख तथा प्रदेश सभेचे मंत्री सत्यनारायण सारडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघठन चे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल, सचिव पियुष राठी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्यामसुंदर सोमाणी, मंत्री अजित नावंदर, जालना जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष प्रदीपकुमार बजाज, मंत्री दिलीपकुमार चेचानी, श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्थेचे भिकमचंद मल, सचिव मदनलाल जाजू, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन चे अध्यक्ष भूषण मालपाणी, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय झंवर यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

“महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनाचे मंत्री सावेंच्या हस्ते थाटात उदघाटन “महाराष्ट्र ट्रेड फेअर” प्रदर्शनाचे मंत्री सावेंच्या हस्ते थाटात उदघाटन
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : दि.१९ डी एम आय सी मध्ये ५२ हजार करोड ची गुंतवणूक आगामी काळात होत...
कोकाटे साहेबांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी मनोज कायदे यांच्याकडे सोपवा; विदर्भासाठी राष्ट्रवादीची ठाम मागणी”
वनिष घोसले यांना सरपंच पदावरून काढण्याचा अमरावती आयुक्तांचा आदेश
तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..!
गेवराई बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ जनावरांची सुटका; जालना येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जवखेडा येथील सरपंच कैलास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
नैसर्गिक अनुदान घोटाळा, 1.30 कोटींचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे अटकेत