शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती

आधुनिक केसरी न्यूज

पाचोरा : दि.६ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील उमेदवार निश्चितीसाठी कंबर कसून कामाला लागले असून पाचोरा मतदार संघातील पाचोरा व भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष नगरसेवक  पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शिवसेने कडून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी जाहीर केला असून आ.किशोर आप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांशी स्वतंत्ररीत्या संवाद साधणार आहेत.शुक्रवारी ता.७ रोजी  सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात  पाचोरा शहरातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून  शनिवारी ता.८ रोजी भडगाव नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती भडगाव येथील शिवसेना कार्यालयात सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहेत. यावेळी इच्छुकांनी प्रभागाच्या परिपूर्ण माहितीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे आहे आवाहन शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त सेवकाने व्यकीत देयकापोटी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन...
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा