पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज

 नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील  सानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी दिनांक 11/ 9/ 2025 रोजी गुरुवारी पहाटे दोन ते साडे दोनच्या सुमारास उलवे येथील त्यांच्या राहत्या घरी घरात कोणी नसताना गळफास घेऊन  आत्महत्या केलेली आहे. या घटनेने नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की स्वप्निल हा नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता त्याच्या पत्नीचा आणि त्याचा किरकोळ  वाद फोनवर झालेला होता  अत्यंत साध्या किरकोळवादातून पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलून घरात कोणी नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे 
 दरम्यान , पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असा होता तो इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच मोठा धक्का बसल्याचे काही पोलिसांनी सांगितले.

 पोलीस खात्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी हा अत्यंत जबाबदारीने काम करत असतो मात्र कधीकाळी कामाचा त्रास व तणावामुळे चिडचिड निर्माण होऊन साध्या किरकोळ भांडणातून देखील असे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे असे प्रकार रोखायचे  असल्यास पोलिसांना  मेडिटेशनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. 

 अनिल गायकवाड 

  मेडिटेशन अभ्यासक

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना  पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या...
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता