चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : दि.1 जून राज्य शासन व युवक सेवा संचालनालय,  पुणे यांच्या 'खेलो इंडिया' उपक्रमांतर्गत आणि साई, मुंबईच्या निर्देशानुसार 'संडे ऑन सायकल' उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या अंतर्गत आज (दि. 1) सकाळी  चंद्रपूर शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, वरिष्ठ लिपिक रंजना शेवतकर व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुरुवात केली.

आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश

सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून यामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, आरोग्यवृद्धी आणि साहसवृत्तीचा विकास साधता येतो. ‘फिटनेस का डोज, अर्धा तास रोज’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या या रॅलीत जनजागृतीपर घोषणांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड व मानधन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. खेलो इंडिया चे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया जिल्ह्यातील सडक सडक अर्जुनी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होळी धुलीवंदनाच्या   दिवशीच दोन बालकांचा...
वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा