केंद्रीय अर्थसंकल्पावर बी.एन.एन. महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

केंद्रीय अर्थसंकल्पावर बी.एन.एन. महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

आधुनिक केसरी न्यूज 

भिवंडी : दि. 7 फेब्रुवारी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयात नुकतेच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 वर चर्चासत्र संपन्न झाले. यात अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर विचार मंथन करण्यात आले. चर्चासत्राचे आयोजन स्टाफ अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी प्राचार्य डॉ. अशोक वाघ म्हणाले की, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्यावर सखोल चर्चा झाली पाहिजे. आपण सर्व जण कर भरतो परंतु आपण अप्रत्यक्ष कर विषयी जागृत नाही. आपल्या मनात अर्थसंकल्पाविषयी जे संभ्रम असतील ते दूर व्हावे यासाठी या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
 या चर्चासत्राचे प्रमुख वत्ते डॉ. मिलिंद नारनवरे, डॉ. विकास उबाळे, डॉ. कुलदीप राठोड, प्रा. सैफ अन्सारी यांनी अर्थसंकल्पातील विविध धोरणांची माहिती दिली. विशेषत: कृषी, रोजगार, करमुक्ती आणि उद्योग क्षेत्रातील नव्या घोषणा यावर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थितांनी आपल्या शंका विचारल्या आणि प्रमुख वक्त्याकडून त्यावर सुस्पष्ट उत्तरे मिळवली. या वेळी स्टाफ अकॅडमीचे अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, उपप्राचार्या डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. सुरेश भदरगे, डॉ. निनाद जाधव, नॅक समन्वयक डॉ. शशिकांत म्हाळुंनकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर निकम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोनम मोरे तर आभार डॉ. सुरेश भदरगे यांनी मानले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..! तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया: बालविवाह करणे हा गुन्हा आहे. बालविवाहा विरुद्ध अनेक कडक कायदे असूनही, बालविवाह अजूनही होत आहेत. १४...
गेवराई बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ जनावरांची सुटका; जालना येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जवखेडा येथील सरपंच कैलास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
नैसर्गिक अनुदान घोटाळा, 1.30 कोटींचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे अटकेत
सरकारी नोकरीच्या अमिषाने दहा लाखाचा गंडा
मुलाच्या लग्नाच्या आहेराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत
डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!