सैराट फेम रिंकू राजगुरु आर्ची उद्या घुग्घूस शहरात
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून घुग्घूस येथे सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने उद्या शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंगु राजगुरु (आर्ची) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० नृत्य गटांनी सहभाग नोंदवला आहे. या विशेष कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस शहरवासीयांनी या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List