देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, प्रमोद कडू, संजय कंचर्लावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुडवाडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, रवी आस्वानी, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, वंदना जांभुळकर, शीला चव्हाण, अनिल फुलझेले, युवा नेते मनोज पाल, चंद्रकला सोयाम, आत्राम, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, बंगाली मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, दशरथसिंग ठाकूर, भाजप महामंत्री किरण बुटले, माजी नगरसेवक रवी गुरनुले, प्रकाश धारणे, युवती प्रमुख मुग्धा खाडे, वंदना हातगावकर, सायली येरणे, सविता दंढारे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर, भाग्यश्री हांडे, निलीमा वनकर, वंदना हजारे, कल्पना शिंदे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, प्रतीक शिवणकर, जितेश कुळमेथे, मंगेश अहिरकर, श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, अस्मिता डोनारकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आजाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी  महामहिम राज्यपाल सि.पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भव्य अश्या या शपथविधी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी शपथविधी कार्यक्रम सुरू होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू करत जल्लोष साजरा केला. तसेच लाडू वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यास भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

३५ फूट उंच मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर ठरले आकर्षणभारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांसाठी ३५ फूट उंच बॅनर लावले होते. हे बॅनर विशेष आकर्षण ठरले.  ३५ फूट उंच बॅनरला चारही बाजूंनी लावण्यात आलेली लायटिंग यामुळे हे बॅनर उठून दिसत होते. त्यामुळे गांधी चौकातील उपस्थितांनी हे बॅनर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप