भारतीय संविधान व पॉस्को या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय संविधान व पॉस्को या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : आज दिनांक 30/11/24 रोजी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद व एस.पी. लॉ कॉलेज चंद्रपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने भारतीय  संविधान, संविधान सभेने स्वीकारून ७५ वर्ष पूर्ण झालीत याचे औचित्य साधून भारतीय संविधान व POSCO या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ श्री.पंकजजी काकडे सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.श्री.रवींद्रजी भागवत, अध्यक्ष लोकमान्य टिळक स्मारक मंडळ, चंद्रपूर उपास्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ऍड. श्री मुकुंदजी  टंडन,अध्यक्ष,अधिवक्ता परिषद, चंद्रपूर ,श्री राहुलजी सराफ,सचिव लोकमान्य टिळक स्मारक मंडळ, डॉ.श्री प्रवीणजी पंत, सदस्य,शाळा समिती अध्यक्ष, ज्ञान मंदिर शाळा ,सौ रश्मी कावडकर,मुख्याध्यापिका, ज्लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर शाळा चंद्रपूर  उपास्थित होते.सदर  कार्यक्रम ज्ञान मंदिर शाळा, हवेली गार्डन रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाला. 

उपस्थित वक्त्यांनी खूप सोप्या शब्दात संविधान व POSCO या कायद्यावर उपस्थित विद्यार्थ्यांना  मार्गर्शन केले. या प्रसंगी वरिष्ठ अधिवक्ता मा. रवींद्र भागवत सर यांनी अध्यक्षीय भाषणात संविधान उद्देशिकाचे महत्व विशद केले. याप्रसंगी संपूर्ण कार्यकारिणी उपास्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळा प्रशाशनने प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्तम संचालन प्रा.सौ राजकारणे तर आभारप्रदर्शन ऍड किरण पाल यांनी केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
आधुनिक केसरी न्यूज बदनापूर : तालुक्यातील सायगाव शिवारात दुधना नदीपात्रातून काही लोकं जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन करत आहेत अशी...
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!
कार्तिक एकादशी...श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा, १ लाखांहूनअधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन