जय हो.....भारतातून २३ वे तर राज्यातून ३ रे  ; CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन

जय हो.....भारतातून २३ वे तर राज्यातून ३ रे  ; CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर  : कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे  (NCISM, New Delhi) व भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली (QCI) संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या २२१ आयुर्वेद महाविद्यालयातून 'ए' ग्रेड व २३ वे मानांकन मिळाले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS, Nashik) संलग्नित मूल्यांकन झालेल्या ५४ आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रात ३ रे मूल्यांकन मिळाले आहे. 
         भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने दिनांक २२ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत महाविद्यालय व रुग्णालयास निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयास 'ए' ग्रेड दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयास यापूर्वी NAAC चे B++, ISO मानांकन तसेच रुग्णालयास NABH चे मानांकन प्राप्त झालेले आहे. 
            QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन यामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, आयुर्वेद  महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी दिली.
             शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘ QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास  प्राचार्य तथा  प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिली.
       यावेळी कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य  डॉ. गणेश डोंगरे  , तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डिकले, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर आणि  जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील आदी उपस्थित होते.
 -------------------
CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन मिळाले  आहे, ही आमच्यासाठी भूषणावह आणि मान उंचावणारी घटना आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार असून राज्यातील या नामांकित  महाविद्यालयास पूर्वीपासूनच NAAC चे B++, ISO मानांकन तसेच रुग्णालयास NABH चे मानांकन प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितचं फायदा होईल. CSMSS  आयुर्वेद महाविद्यालय  आणि रुग्णालयाच्या आमच्या अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक तसेच सचोटीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

                                           श्री. पद्माकरराव मुळे                                                 सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा  : तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली...
दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू! गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश
भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
धक्कादायक : पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडला मेलेला उंदीर - देवरी तालुक्यातील अतिदुर्गम धवलखेडी येथील धक्कादायक प्रकार..!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण