ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने लावली महापुरुषांच्या प्रतिमेला "आचारसंहीता"
(अनेक महापुरुषांच्या प्रतीमा केला उलट्या)
रिसोड:- ऑक्टोबर 2024= आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात निवडणुक आयोगाने मागील 16 ऑक्टोबर पासुन आचारसंहिता लागु केली आहे,आचारसंहिते मध्ये कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिमा,बॅनर या सारख्या बाबीतुन आचारसंहितेचा भंग होईल आशा अनेक बाबीवर बंदी लागलेली आहे.परंतु रिसोड येथिल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने चक्क दिवंगत राष्टपुरूषांच्याच प्रतिमा उलट्या लटविल्याने महापुरूषांच्या प्रतिमांचा आपमान केल्याची बाब ता.25 ऑक्टोबर ला सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.
येथिल पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग येतो.सदर विभागा मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता राम चापे,साहाय्यक अभियंता एच.पी.गव्हाणे,कंत्राटी अभियंता जितेंद्र देशमुख,अजय जोगदंड यांची नियुक्ती आहे.तालुक्यातील जल जिवण मिशन अंतर्गत बहुतांश गावातील निळयोजनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची संपुर्ण जबाबदारी याच कार्यालयाची आहे.सदर कार्यालयाचा कारभार हा स्थानिक पंचायत समितीच्या जुण्या इमारती मध्ये चालतो,अर्थात गटविकास अधिकारी यांचे कार्यालय ग्रामीण पाणीपुरवठा विभागा पासुन नविन इमारती मध्ये अंतरावर आहे.विधानसभा निवडणूक संदर्भात आचारसंहीतेचे काटेकोरपणे पालण करण्या संदर्भात बिडीओ यांनी काही सुचना दिल्या परंतु येथिल ग्रामीण पाणीपुरवठा बिडीओ यांच्या आदेशा पुढे जात आचारसंहितेचे नियम महापुरूषांच्या प्रतिमांना लागु करीत सुमारे आठ महापुरूषांच्या प्रतिमा जागेवरच उलट्या करीत महापुरूषांच्या प्रतिमांचा आपमान केल्याची घटना ता.25 ऑक्टोबर ला घडली आहे.यावर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला विचारणा केली आसता.महापुरूषांच्या प्रतिमा पुर्णपणे उलट्या करण्याचे आदेश बिडीओ यांनीच दिल्याची माहीती मिळाली.
चौकट वैशाली देवकर (निवडणुक निर्णय अधिकारी रिसोड विधानसभा)
= आचारसंहितेचे पालन पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे.परंतु आचारसंहिता ही महापुरूषांच्या प्रतीमा साठी लागु नाही,सदर प्रकरणाची योग्यती चौकशी करण्यात येईल
चौकट किशोर लहाणे (प्रभारी बिडीओ रिसोड) = आचारसंहितेचे पालन करण्या संदर्भात सर्वच कार्यालयाना सुचना दिल्या आहेत.परंतु महापुरूषांच्या प्रतिमा उलट्या करून ठेवण्याच्या सुचना दिलेल्या नाहीत.सदर प्रकार हा चुकीचा आहे.
Comment List