अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान 

अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान 

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : श्रध्दा  सबुरी व जगाला सर्व धर्म समभावाची  शिकवण देणा-या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची मोठी श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. ५ ऑक्‍टोबर रोजी मुंबई, महाराष्‍ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी एक कोटी रूपये किमतीचे  १ किलो ४३४ ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम व कलाकुसर केलेली सोन्‍याची पंचारती अर्पण केली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गाडीलकर म्हणाले की  पंचारतीची किंमत जवळपास सुमारे १ कोटी रुपये असून ही सुंदर नक्षिकाम असलेली समई साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आली. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. 
तसेच, मागील आठवड्यात देखील  हैद्राबाद येथील एका साईभक्ताने  आपल्या श्रध्देपोटी   साईबाबा संस्थान कडे १ कोटी ८ लाख रुपये किमतीचा डिमांड देखील  ड्राफ्ट प्राप्‍त झाला आहे. दिवसेंदिवस साईबाबा संस्थानकडे सोने दागदागिने  जडजवाहीर सह रोख रक्कम धनादेश या माध्यमातून दानराशि देणगी स्वरुपात प्राप्त होत आहे यात गुप्त दान देण्यात देखील काही साईभक्त समाधान प्राप्त करत असतात.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 06  जिल्ह्यास विविध स्त्रोतातून प्राप्त होणा-या निधीतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जातो. यात सर्वसाधारण...
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!
चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील