गौराईला आज पुरणपोळी म्हणजे मुख्यमंत्री जेवनाचा बेत 

गौराईला आज पुरणपोळी म्हणजे मुख्यमंत्री जेवनाचा बेत 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके  :"श्रीगणेशाच्या आगमनानंतर मंगळवारी (दि. १०) हर्षोल्हासात गौरींचे आगमन झाले आहे. बुधवारी (दि. ११) ज्येष्ठा गौरींचे दुपारी आरती   करण्यात येवून  त्यासाठी पंचपक्वान्न तयार करून १६ भाज्यांसह पुरणपोळी त पोळी,भाजी,आमटी,भजे,कुरडई, भात,वरण,गुळवणी, आदि समावेश असतो म्हणून कि काय त्याला मुख्यमंत्री जेवनाचा बेत काहि ठिकाणी म्हटलं जात.  यासाठी बाजारपेठेत विविध भाज्यांसह १६ भाज्यांचे वाटे, केळीची पाने व अन्य पुजा साहित्य विक्रीसाठी आले आहे. त्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सकाळपासूनच दिसुन आली. 
 गणेशासोबतच गौरींच्या आगमानाची तीन दिवसांच्या माहरेपणासाठी आलेल्या गौरी सर्वत्र आनंदाची उधळण करत आहेत. त्यांच्या पाहुणचारासाठी पंचपक्वान्नांची तयारी करण्यात आली आहे. त्यांना  १६ भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यासाठी महिलांची एकच लगबग सुरू आहे. त्यासाठी बाजारात खर्सुले, गिलके, भोपळा, दुधी भोपळा, कारली, भेंडी, फुलकोबी, पत्ताकोबी, शेवगा-चवळी व गवाराच्या शेंगा, तेंडुले, कर्टुले, पालक, मेथी, अंबाडी आदी भाज्यांसह १६ भाज्यांचा समावेश असलेला वाटाही विक्रीसाठी आला होता. त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कमी राहू नये म्हणून महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गौरींच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस यंत्रणेला आता आधुनिक सुविधांचे बळ मिळणार आहे.भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील भोकरदन,पारध बु., जाफ्राबाद...
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 
आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान