परमपूज्य खडेश्वरी बाबांचे कार्य समाजाला कस्तुरीप्रमाणे सुगंध देणारे- माजी मंत्री अर्जुन खोतकर
आधुनिक केसरी न्यूज
प्रा. बाबासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी कर्मकांडावर प्रहार करून समाजाला खऱ्या आध्यात्म्याची जाणीव करून दिली त्याचप्रमाणे शिवशक्ती आश्रमातील खडेश्वरी बाबाजींचे कार्य भक्त आणि समाजाला कस्तुरीप्रमाणे सुगंध येणार आहे असे प्रतिपादन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.बदनापूर तालुक्यातील शिवशक्ती आश्रमातील श्रीराम मंदिर शिलान्यास पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
परमपूज्य खडेश्वरी बाबाजींच्या संकल्पनेतून अयोध्येच्या धर्तीवर शिवशक्ती आश्रम परिसरात साकारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर शिलान्यास पूजन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री अर्जुन खोतकर,खा. कल्याण काळे,आ.संतोष दानवे,आ.नारायण कुचे,जालना शिवसेना प्रमुख भाऊसाहेब घुगे,भास्कर आंबेकर,कैलास चव्हाण,बबलू चौधरी,डॉ.देवेश पाथ्रीकर,जगदीश प्रथाणी, डॉ.आदिनाथ पाटील,डॉ.रामदास सांगळे,डॉ.किशोर टेपले, यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले साधुसंत, तसेच राजकीय,सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना खोतकर म्हणाले की,परमपूज्य खडेश्वरी बाबांचे कार्य समाजाला कस्तुरीप्रमाणे सुगंध देणारे आहे. त्यांनी अध्यात्मास सामाजिकतेची जोड देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.संत गाडगेबाबांनी माणसात देव शोधून मानवजातीची सेवा केली.त्याचप्रमाणे खंडेश्वरी बाबांचे समाज प्रबोधनाचे कार्य चालू आहे.आषाढी यात्रेत शिवशक्ती आश्रम ते पंढरपूर मार्गावर हजारो झाडांचे वृक्षारोपण करून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे खोतकर यांनी उपस्थितांना सांगितले. शिवशक्ती आश्रमातील श्रीराम मंदिर निर्माण कार्यास पूर्णपणे सहकार्य राहील असेही खोतकर म्हणाले.
Comment List