विधानसभा निवडणुकीवर शरद पवारांचे मोठे भाष्य : महाराष्ट्राची निवडणूक जाहीर ....
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर : बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचं नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो असे शरद पवार साहेब म्हणाले.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचं जास्त महत्त्व वाटतं. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझं आवाहन आहे. असेही शरद पवार साहेब यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवार साहेब म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची भूमिका मांडली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुकांच्या घोषणा झाल्या आहेत, मात्र महाराष्ट्राची निवडणूक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा विरोधाभासात्मक आहे आणि याबद्दल अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक स्पष्ट झाल्याशिवाय, पंतप्रधानांच्या घोषणेला योग्य प्रतिसाद देणे कठीण होईल, असे शरद पवार साहेब म्हणाले.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, अगोदर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. मात्र तेव्हा जम्मू काश्मीर विधानसभा नव्हत्या. आम्ही यावेळेस हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात निवडणुका होतील. असेही शरद पवार साहेब यांनी बोलताना सांगितले.
शरद पवार साहेब म्हणाले की, निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र अद्याप त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Comment List