राहुल गांधीनी पंढरपूरच्या विठ्ठलास फसवलं ; राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य अजित सोनवणे
आधुनिक केसरी न्यूज
सुशिल गायकवाड
लोणंद : काँग्रेसचे राहुल गांधी हे आषाढी एकादशीस पंढरपुरला येणार होते.परंतु अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याने त्यांच्यावर विरोधकांकडुन सडकून टीका करण्यात येऊ लागली आहे.गर्दीचै कारण देत हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा दिले होते.परंतु कुणाची तरी मर्जी राखण्यासाठी राहुल गांधी यांनी हा दौरा रद्द केल्याच्या टीका त्यांच्यावर होऊ लागल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक महाराष्ट्र प्रदेश सदस्य अजित सोनवणे यांनी ही राहुल गांधी यांच्यावर टीकटात्मक प्रतिक्रिया दिली आहे.राहुल गांधीनी पंढरपूरच्या विठ्ठलास फसवलं आहे.असे अजित सोनवणे यांनी म्हटलेले आहे.
अजित सोनवणे यावर बोलणाताना म्हणतात की,
महाराष्ट्र मधील सर्वात जुनी परंपरा असलेली पंढरपूरची वारी या वारीमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींना आमंत्रण दिल होतं.त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं होतं.मी येतो असंच त्यांना सांगितलं होतं.पण काय अदृश्य फोन राहुल गांधींना गेले आणि मताच्या राजकारणासाठी राहुल गांधींनी तो पंढरपूरचा दौरा रद्द केला.अखंड महाराष्ट्रातील वारकरी आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जात असतात.पंढरीच्या दिशेने जात असतानाआपलं मागणं पंढरपूरच्या विठ्ठलाला काहीतरी मागत असतात.पंढरपूरचा विठ्ठल त्यांची इच्छा पूर्ण करत असतो.पण राहुल गांधी यांनी साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलास फसवलं.त्यामुळे येत्या विधानसभेला आता पंढरपूरचा विठ्ठल राहुल गांधीला फसवेल यात काही शंका नाही असे वक्तव्य सुद्धा अजित सोनवणे यांनी केले आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List