छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्रमुख व गजबजलेल्या वसाहतीत सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन सीसीटिव्ही मध्ये कैद झाले. याला वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक रहिवाशांनी सीसीटिव्हीचे फुटेजचा आधार घेत तो बिबट्याच असल्याचा दावा केला आहे. उल्का नगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीतील साईशरण पेट्रोलपंप नजीकच्या खिंवसरा पार्कजवळच्या प्लॉट नं. ६४ च्या आसपास मोकळी जागा असून त्या भागात सुमारे ३०० झाडे आहेत. याच ठिकाणी झाडांआडून पळताना बिबट्या पळत आहे. या संदर्भात नगरसेवक दिलीप थोरात यांनी तो प्राणी बिबट्याच असून सुरुवातीला आम्हाला अफवा वाटली, पण सीसीटिव्ही फुटेज पाहता तो बिबट्याच असल्याचे दिसते, असे सांगितले. दरम्यान, या फुटेज समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रकांत पतरंगे गडचिरोली : जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर...
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 
नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 
राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!
गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 
चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण