खळबळजनक....शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार येथे चालणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर छापा

 तीन मुलींची सुटका एकास पकडले एक फरार 

खळबळजनक....शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार येथे चालणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर छापा

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी :  शिर्डी विभागाचे  डी वाय एस पी शिरीष वमने यांना ९जुलै रोजी  गुप्त माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार मध्ये एका इसमाने वेश्या व्यवसायाकरिता तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करणे करिता त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश केल्याने पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी कारवाई करणे कामी एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठविले तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याचे हॉटेलमधील मुली दाखवून  बनावट  ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केले  बाबत पथकातील अधिकारी  व पंचांची खात्री होतात हॉटेल साई वसंत विहार येथे छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले आणि वेश्याव्यवसाय चालवणारा शुभम अशोक आदमाने वय २७ राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर यास ताब्यात घेतली असून त्याचा साथीदार २) नाना शेळके हा फरार झाला आहे वरील तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांची सोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले आहे व वरील दोन्ही आरोपी  विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४ /२०२४  स्त्रीया व मुली अनैतिक  व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे जिल्हा  पोलीस अधीक्षक  राकेश ओला  अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे  उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमणे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार  कायदे इरफान शेख  अशोक शिंदे  दत्ता तेलोरे  बाबा खेडकर  गणेश घुले  श्याम जाधव  सविता भांगरे  पवार चालक  गोलवड  ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी  भाग घेतला

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
आधुनिक केसरी न्यूज  राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ...
22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना
जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...
गुरूविना कोण दाखवील वाट..!
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर
लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...