डोणगाव सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर 

सरपंच पद कोणाचे चरण स्पर्श करणार याची  सर्वत्र चर्चा

डोणगाव सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर 

आधुनिक केसरी न्यूज 

 ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मेहकर तालुक्याची आर्थिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत ही डोणगावची आहे
नेहमीच चर्चेत असणारी ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी ग्रामपंचायत डोणगाव.
डोणगावच्या सरपंच रेखा रवी पांडव यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव १३ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला आहे. रेखा पांडव यांच्या विरोधात ३ जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे या कारणांवरून मेहकर तालुक्याचे तहसीलदार निलेश मडके यांच्याकडे अविश्वास ठरावासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी दिनांक ८जुलै रोजी तहसीलदार निलेश मडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. यासाठी डोणगाव ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य उपस्थित होते.

डोणगाव ग्रामपंचायतच्या १७ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी विद्यमान सरपंच रेखा पांडव यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी मेहकर तहसीलदार निलेश मडके यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसिलदार मडके यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दि . 8 जुलै रोजी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी म एकूण १७ सदस्य उपस्थित होते. यापैकी १३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर सरपंच रेखा पांडव व इतर ३ सदस्यांनी यांनी ठरावाच्या विरोध केला.
यावेळी भगवान  वामनराव बाजड, शिवचरण विजय आखाडे, श्याम प्रल्हाद इंगळे,संजु निवृत्ती जमदाडे,सलमाबी सैय्यद नूर अत्तार, जोईप खाँ बिस्मिला खाँ, नंदा मुरलीधर लांभाडे, शेख मदन शेख दाऊत, फरजाना बी सत्तार शाह, पूजा सचिन साखळकर,जयश्री भूषण आखाडे, संदीप नागोराव टाले, सिंधू राजू खोडके, निर्मला प्रकाश बाजड, मीना रमेश काळे, शे कय्युम शे उस्मान  आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच रेखा पांडव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आता पुढील सरपंच कोण होणार ? सरपंच पद कोणाचे चरण स्पर्श करणार याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..! साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज  नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत...
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन