लोह्यात अनोळखी इसमाचे प्रेत नदी पात्रात आढळले

लोह्यात अनोळखी इसमाचे प्रेत नदी पात्रात आढळले

आधुनिक केसरी न्यूज 

मोहन पवार 

लोहा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी पूलाखाली एका पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदरील घटनेप्रकरणी प्रारंभी लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
                लोहा शहर बस्थानकापासून अवघ्या दीडशे मिटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमी पूला खालील पाण्यात दि.२१ रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे कचरा वेचणाऱ्याच्या निदर्शनास येताच त्याने इतर नागरिकांना घटनेची माहिती कळवली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. प्रेत सडलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शव विच्छेदन करण्यात येवून बाजूलाच असलेल्या स्मशानभूमीत सदरील प्रेतास दफन करण्यात आले. प्रेताची ओळख पटविण्यासाठी लोहा पोलिसांनी पथक नियुक्त केले असून सदरील प्रेताची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पो उपनि विश्वदीप रोडे, सपोउपनि लाडेकर, गुरू कारामुंगे, अशोक केंद्रे आदींची उपस्थिती होती.
            पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार सदरील प्रेत हे चार ते पाच दिवसांपूर्वी पाण्यात पडले असावे.. कदाचित तो मच्छिमार असेल यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. खून की आत्महत्या अथवा अपघात याबद्दल लोहा शहरातील नागरिकांतून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  मुंबई : (७ नोव्हेंबर) अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यानी  कर्तव्यावर असताना...
वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!