ओबीसी नेते हाके यांना सरकारच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासन... कुणावरही अन्याय...

ओबीसी नेते हाके यांना सरकारच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासन... कुणावरही अन्याय...

.

आधुनिक केसरी न्यूज 

जालना : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल  हे यावेळी उपस्थित आहेत.
शिष्टमंडळाने श्री. हाके व श्री. वाघमारे यांच्यासमवेत त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. श्री. महाजन म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारशी अवश्य चर्चा करावी. जेणेकरुन त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल. शासन आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करु नये. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती यावेळी उपोषणकर्त्यांना करण्यात आली. 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..! साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज  नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत...
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन