विद्यार्थ्यांसोबत आता गुरुजीही येणार गणवेशातच शाळेत ; शासनाचा आदेश धडकला; रंग ठरविण्याचा अधिकार शाळास्तरावर

विद्यार्थ्यांसोबत आता गुरुजीही येणार गणवेशातच शाळेत ; शासनाचा आदेश धडकला; रंग ठरविण्याचा अधिकार शाळास्तरावर

आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे 

निफाड :- शाळांमध्ये आतापर्यंत विद्यार्थीच गणवेशात दिसून यायचे पण, आता राज्यात असलेल्या शाळेतील शिक्षक संवर्गासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आल्याने गुरुजन वर्गही आता शालेय गणवेशात दिसणार आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र निर्गमित केले आहे. त्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असून गणवेशाचा रंग ठरविण्याचा निर्णय मात्र शाळास्तरावर सोपविण्यात आला आहे. 
    शिक्षकवृंद हा शाळेतील नव्हे तर समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक भावी पिढी घडविण्याचे काम करतात. जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचा संपर्क येत असतो. नियमित संवादही होत असतो. विद्यार्थी हा अनुकरणीय असल्याने शाळेतील शिक्षकांनी योग्य व शिक्षकी पेशाला अनुकूल आणि साजेशा असणे अपेक्षित आहे. यातून शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. शिक्षक संवर्गासाठी गणवेशासंदर्भात मार्गदर्शन सूचना दिलेल्या असून पत्रही निर्गमित केले आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षक गणवेशात दिसणार आहे.

● कसा असावा गणवेश 
     शिक्षकांनी हलक्या रंगाचे शर्ट, गडद रंगाची फुलपँट, ट्राऊझर इन केलेला असावा. पायात बुट तर महिलांसाठी साडी, सलवार कमीज, दुपट्टा, चप्पल किवा आवश्यक असल्यास बुट परिधान करावा. शर्टवर कुठलेही चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे नसावे. गडद रंगाचे कपडे, जीन्स आणि टी शर्ट घालू नये. स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहणार आहे. शिक्षकांच्या नावासमोर इंग्रजीत टीआर तर मराठींत टी असे लिहिण्यात यावे. शिक्षकांना याबाबत संबोधन व बोधचिन्ह त्यांच्या वाहनांवर लावता येईल.

● शासनाच्या शिक्षक संदर्भातील ड्रेस कोडच्या निर्णयाला सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. नेहमीच्या वातावरणातून काहीसा बदल होताना दिसत आहे. यामुळे शैक्षणिक वातावरण आणखी प्रभावी होणार आहे.
डॉ.श्रीकांत आवारे
अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन कमेटी

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आर्थिक परिस्थितीवर मात करत सुभाष बारसे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण  आर्थिक परिस्थितीवर मात करत सुभाष बारसे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण 
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टड अकाउंटट परीक्षेत सुभाष दत्तू बारसे तीनशे पैकी एकशे पन्नास गुण...
पारनेर तालुक्यातील निघोज मध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला ४,८६,१०६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत..!
लेफ्टनन कर्नल वीर जवान अथर्व कुंभार यांना विरमरण पलूस वर शोककळा, साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार  
आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप..!
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
औषधांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसेल, तर खरेदीचा उपयोग काय : आ.किशोर जोरगेवार
गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याबाबत सतर्कतेचा इशारा