आज 23 मार्चचे राशिभविष्य : 'या' राशीच्या विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचे शुभ योग

आज 23 मार्चचे राशिभविष्य :  'या' राशीच्या विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचे शुभ योग

आधुनिक केसरी 

मेष

इतरांकडून कामे करून घेण्यात विशेष यश येईल. आर्थिक व सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन कामे मिळण्यास शुभसंकेत. जुन्या मित्रांच्या अचानक भेटीने मन प्रसन्न.

वृषभ
नवीन काही शिकण्यास शुभ कालखंड. परदेश गमन विषयी शुभ संकेत. परिवाराचे अपेक्षित सहकार्य मिळेल. संयम बाळगणे आवश्यक.

मिथुन
कामाच्या ठिकाणी सहकारयाचे अपेक्षित सहकार्यामुळे ताण कमी होईल. जोडीदाराची आर्थिक बाजू मजबूत होईल व मनातील संशय दूर होतील.

कर्क
नशिबाची अपेक्षित साथ मिळाल्याने मन प्रसन्न होईल. सरकारी क्षेत्रातील कामे पूर्ण होण्याचे संकेत. व्यवसायात प्रगतीचा कालखंड. भावाबहिणी कडून शुभवार्ता मिळण्याचे योग.

सिंह
विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचे शुभ योग. परदेश गमनाची शक्यता. सहज पैसा कमवण्याची मनस्थिती तयार होईल. संतती विषयी चिंता कमी होईल. नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता.

कन्या
जोडीदाराच्या प्रगतीने मन प्रसन्न होईल. संतती ‌‌विषयक चिंता समाप्त होण्याचे शुभ योग. आईच्या तब्येतीमध्ये विशेष सुधार होण्याचे योग. काळजीचे सावट दूर होतील.

तुळ
आध्यात्मिक रूची ‌वाढेल. संततीची प्रगती विशेष राहील. आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग विशेष. दुरावलेला मित्रपरिवार परत मिळेल.

वृश्चिक
सरकारी क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तीच्या भेटीने कामांना गती मिळेल. जमिनीसंबंधित अडकलेली कामे मार्गी होतील. विद्यार्थ्यांचे विद्या अभ्यासात मन लागेल व बरेच प्रश्न सुटण्यास मार्ग मोकळा होईल.

धनु
व्यवसायातील अडचणी दूर होण्याचे योग. परिस्थितीत समाधानकारक वातावरण. आईकडून विशेष लाभ होण्याची शक्यता. मित्रपरिवारामुळे आनंददायक वातावरण.

मकर
छोट्या प्रवासाचे तात्काळ योग. अडकलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर. दुरावलेल्यांची मनधरणी करण्यास कालखंड चांगला. झाले गेलेले विसरून नवीन सुरूवात करण्यास चांगला कालखंड.

कुंभ
अपेक्षित आर्थिक प्रगती होण्याचे शुभयोग. सहकार्याची विशेष मदतीचे योग. वातावरणातील राजकारण कमी होऊन प्रगतीचा आलेख उंचावेल.

मीन
संततीच्या प्रगतीने मन प्रसन्न होईल. छोट्या प्रवासाचे योग. प्रेमप्रणयासंबंधी चांगला कालखंड. दुरावलेला मित्र परत येण्याने वातावरण आनंदी.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे
  आधुनिक केसरी न्यूज धोंडीबा मुंडे  कंधार : तालुक्यातील फुलवळ सर्कल मधील शेकापुर येथे काल दि.२३ जून रविवारी जनसंवाद बैठकीचे
बारुळ मानारचे पाणी उदगीर-जळकोटला घेऊन जाणाऱ्या पाईपलाईन योजनेचे काम शिवसेनेने पाडले बंद
नीटच्या परीक्षांमधील गोंधळावरून जयंत पाटलांंनी थेट मोदींना लगावला 'हा' टोला....सत्तेवर येताच क्रांतिकारी
लोह्यात अनोळखी इसमाचे प्रेत नदी पात्रात आढळले
भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले
 देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच...
वाकद ग्राम पंचायतला सरपंचासह सदस्यांनी लावले कुलूप