लोकसभा विश्लेषण : भाजप 'फ्रंट फुटवर' तर काँग्रेस 'नेट प्रॅक्टिसमध्येच' दंग !

लोकसभा विश्लेषण : भाजप 'फ्रंट फुटवर' तर काँग्रेस 'नेट प्रॅक्टिसमध्येच' दंग !

 

 

IMG-20240322-WA0259आधुनिक केसरी न्यूज 

 शाम हेडाऊ 

लोकसभेच्या मैदानावर आता भारतातल्या सगळ्या टीम उतरल्या असून हा सामना कोण जिंकेल याकडे आता न केवळ भारत तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे . भाजप टीमला लोकसभेचा चषक जिंकण्याची आशा असून त्यादृष्टीने त्यांनी विरोधी टीमला चारशे पार च आव्हान देण्याचं ठरवलेलं आहे.  महाराष्ट्राच्या टीमने ओपनिंग बॅट्समन म्हणून चंद्रपूरातील सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दायित्व दिलं असून , सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा  महाराष्ट्रातील लोकसभेच्या मैदानावर उतरत थेट चौकार , षटकार आणि चोरट्या धावा घेत 400 पार च्या टारगेटमध्ये आपले शतक असावं यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत . त्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती ही अवाक करण्यासारखी आहे . ओपनिंग बॅट्समन म्हणून ग्राउंड वर उतरताच त्यांनी सगळ्यांना भ्रमणध्वनीवरून चारसो पार च टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले . तर लगेच विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या मॅचेसचे आयोजन करत त्यांनी आपल्या धावा जमवणे सुरू केले आहे . एका बाजूला लोकसभा चषकातील भाजपाच्या टीमने चंद्रपुरातून चारसोपारचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी थेट मैदानावर उतरून फटकेबाजी सुरू केली असली तरी काँग्रेस टीमची मात्र अजूनही नेट प्रॅक्टिसच सुरू असल्याचे दिसत आहे . सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजाच्या समोर तुल्यबळ असा गोलंदाज उभा करण्यास काँग्रेस अजूनही चाचणीच करत आहे. 
           काँग्रेस टीमचे सर्वेसर्वा असलेल्या हायकामंड ने खेळाडूची निवड करण्यासाठी  व्यवस्थापक,  कोच , सल्लागार अशा सगळ्यांची बैठक थेट दिल्ली दरबारी आयोजित केली . यात मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असलेले चंद्रपुरातील धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन्ही खेळाडू यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे . या लॉबिंग मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या सहकारी टीमने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची भेट घेऊन धानोरकर या सर्वोत्तम खेळाडू असल्यामुळे त्यांच्याकडे सुधीर मुनगंटीवार या फलंदाजाला रोखण्याचे कौशल्य व क्षेत्ररक्षणाची मजबूत टीम असल्याचे सांगत त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. 
             दुसऱ्या बाजूला सुधीर मुनगंटीवार यांची फटकेबाजी रोखण्यासाठी धानोरकर यांना क्षेत्ररक्षणात मदत करणाऱ्या सकल कुणबी समाजाने वडेट्टीवार नावाचा खेळाडू मैदानात उतरल्यास आम्ही क्षेत्ररक्षण करणार नाही . अशी थेट भूमिका हायकमांड कडे एका पत्रकाद्वारे केलेली आहे . तसे पत्रक थेट समाज माध्यमावर प्रसारित करून वडेट्टीवर नामक खेळाडूसमोर निवडीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . गेल्या आठवड्याभरापासून दिल्ली दरबारी हाय कमांड च्या मार्गदर्शनात तुल्यबळ खेळाडूची निवड व्हावी यासाठी धमासान अशा वातावरणात बैठकांचे सत्र सुरू असून अजूनही योग्य खेळाडूची निवड न झाल्यामुळे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या मैदानावर फ्रंट फूट वर येत धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली आहे . परंतु विरोधी टीम असलेल्या काँग्रेसच्या खेळाडूची निवड होत नसल्यामुळे संपूर्ण टीम नेट प्रॅक्टिस मध्येच दंग असल्याचे चित्र आहे .
              भारतीय लोकशाहीचा चषक उंचावण्यासाठी भाजपचे ओपनिंग बॅट्समन  सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच तडाखे बंद फलंदाजीला सुरुवात केली असून त्यांच्या या फलंदाजीला आवर घालण्यासाठी योग्य असा गोलंदाजच काँग्रेस टीमला सापडू नये व आपल्या फटकेबाजीला क्षेत्ररक्षणाचा अडथळा येऊ नये अशी लॉबीग सुधीर मुनगंटीवार सुद्धा करत असल्याचे दबक्या आवाजात सर्वत्र बोलल्या जात आहे . आपले शतक निर्विघ्नपणे पार पाडावे व लोकशाही चषक उंचविण्यामध्ये आपण अग्रेसर राहावे या दृष्टीने मुनगंटीवार हे सर्वतोपरी प्रयत्न करत असून याच प्रयत्नातला एक भाग म्हणून काँग्रेस खेळाडूंना नेट प्रॅक्टिस मध्येच दंग ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलल्या जात आहे . 
       संपूर्ण देशासाठी आवश्यक असलेला लोकशाहीचा चषक कोण उंचावेल ? आणि कोण या शतकाच्या उंचावण्यामध्ये आपला हातभार लावेल ? या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये मात्र अजूनही विरोधी टीम असलेल्या काँग्रेसने साधा खेळाडू सुद्धा निवडू नये याबाबत सर्वत्र कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात असून , क्षेत्ररक्षणासाठी उत्सुक असलेल्या समाजामध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे .

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..! देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील...
सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!
Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...
आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.
लाडक्या बहीनीसह दाजीला बॅक खात्यात कधी पैसे पडणार याची चिंता 
शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक