आजचे राशीभविष्य:  आज  काहींची आर्थिक कामे मार्गी लागतील...  पहा कोणत्या आहेत 'त्या' राशी..

आजचे राशीभविष्य:  आज  काहींची आर्थिक कामे मार्गी लागतील...  पहा कोणत्या आहेत 'त्या' राशी..

आधुनिक केसरी न्यूज

जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....

मेष : शुभ रंगः क्रिम शुभ अंक : ८

आज घराबाहेर वावरताना रागिट स्वभावावर नियंत्रण असुद्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

वृषभ : शुभ रंगःहिरवा, शुभ अंक : ५

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकही प्रभावीत होतील.

मिथुन : शुभ रंगःतांबडा, शुभ अंक : ४

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.

कर्क : शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : ८

असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

सिंह : शुभ रंगःस्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७

आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस अाहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोड तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला.
कन्या : शुभ रंगःनिळा, शुभ अंक : ६

भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणेच आज योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करु नका.

तूळ : शुभ रंगः राखाडी, शुभ अंक : ५

सहज काही मिळाले नाही तरी आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्यांना दुखाऊ नका.

वृश्चिक : शुभ रंगः पांढरा, शुभ अंक : ९

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको, नाकासमोर चाला.

धनु : शुभ रंगःमोरपंखी, शुभ अंक : २

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदारास अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

मकर : शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येत थोडी नरम असेल.
कुंभ : शुभ रंगःजांभळा, शुभ अंक : ३

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकारांना विविध संधी चालून येतील.

मीन : शुभ रंगःगुलाबी, शुभ अंक : १

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गडचिरोलीच्या विकासाला नवे इंजिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’चे भव्य उद्घाटन गडचिरोलीच्या विकासाला नवे इंजिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’चे भव्य उद्घाटन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रकांत पतरंगे.   गडचिरोली : 27 डिसेंबर 2025 “गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून, तो आता महाराष्ट्राचा पहिला...
सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 25 कोटी रुपयांच्या निधीला मिळाली मंजुरी
गिरड तालुका भडगाव शिवारात बिबट्या तळ ठोकून बिबट्याची  पिले आढळली गिरड सह परिसरात भीतीचे वातावरण
सोलापूर किडनी रॅकेट प्रकरण! किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात खरेदी केल्यात मोक्याच्या ठिकाणी  ५५  एकर जागा
नव्या वर्षाच्या स्वागता करीता श्रींच्या भाविकांसाठी आनंदाची पर्वणी, ३१डिसेंबरला श्रींचे मंदिर रात्रभर उघडे राहणार
नांदेड हादरले : एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडिलांचा गळफास; दोन मुलांनी रेल्वेखाली देत संपवले जीवन