सणासुदीच्या काळात बँक ग्राहकांना मिळणार गिप्ट

 सणासुदीच्या काळात बँक ग्राहकांना मिळणार गिप्ट

 आधुनिक केसरी न्यूज

सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात अधिक नफा कमविण्याची संधी दिली आहे. बँकेने त्यांच्या विविध मुदत ठेवींच्या कालावधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने मे २०२३ आणि मार्च २०२३ मध्ये किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

बँक ऑफ बडोदाने ३ वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी  मुदत ठेवी वरील  व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्स पर्यंत वाढ केली आहे. बँकेने सांगितले की, हे नवे दर ९ ऑक्टोबर २०२३ पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत.

असे असणार सामान्य नागरिकांसाठी नवे व्याजदर 
७ दिवस ते १४ दिवस            - ३.५०
१५ दिवस ते ४५ दिवस        -  ३.५०    
४६ दिवस ते ९० दिवस        -  ५    
९१ दिवस ते १८० दिवस      -     ५    
१८१ दिवस ते २१० दिवस    - ५.५०    
२११ दिवस ते २७० दिवस    - ६    
२७१ दिवस ते १ वर्ष            -  ६.२५    
२ वर्ष ते ३ वर्ष                 - ७.२५    
बडोदा तिरंगा प्लॅन ३९९ दिवस -  ७.१५    

आता तुम्हाला  मिळणार एवढे व्याज  
नवे दर लागू झाल्यानंतर बँक आता आपल्या ग्राहकांना २ ते ३ वर्षांच्या एफडी वर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी ७.७५ टक्के व्याज मिळत आहे. सध्याच्या ग्राहकांनाही वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आहे. याशिवाय बँकेने आपल्या तिरंगा प्लस ठेव योजनेवर ३९९ दिवसांसाठी व्याजदरदेखील बदलले आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मराठवाड्यासाठी भूषणावह कामगिरी : CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे 'ए' ग्रेड मूल्यांकन मराठवाड्यासाठी भूषणावह कामगिरी : CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे 'ए' ग्रेड मूल्यांकन
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी, पैठण रोड येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व...
महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ
Breking News : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापुरात आयसीस चा दहशतवादी जुबेर हंगरगेकर पयाला पुणे एटीएस ने केली अटक 
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी सज्ज  ११५० जादा बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
भिगवण कृषी उत्पन्न उपबाजारात आडतदारांचा अचानक संप; शेतकरी नाराज 
काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील