तुम्ही राजीनामा देणार नाही, कारण… आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

 तुम्ही राजीनामा देणार नाही, कारण… आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

 आधुनिक केसरी न्यूज

 छत्रपती संभाजीनगर : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूसत्राप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आदित्य ठाकरे  यांनी आज संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांना असणाऱ्या असुविधा आणि रिक्त पदांसदर्भात त्यांनी अधिष्ठांताकडून माहिती घेतली. यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मागील आठवड्यात महाराष्ट्रात ज्या घटना झाल्या त्यात नांदेडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूरसह विविध शहरांतूनही अशा घटना समोर आल्या. साधारपणे सरकारी रुग्णालयात औषधे कोणती घ्यायची हे सांगितले जाते. परंतु, ही औषधे बाहेरून आणायला सांगितले जाते. या प्रकरणात राजकारण करता आले असते. मोर्चे, आंदोलनेही करता आली असती. मात्र, या प्रकरणात सरकार कुठेच दिसत नाही. त्यामुळे विरोधक असल्याच्या नात्याने आपण रुग्णालय अधिष्ठांतांशी चर्चा करून समस्या सोडवणार आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ते पुढे बोलतांना म्हणले, २९ जुलै रोजी मी ट्विट केले होते. त्यावेळी केईएम रुग्णालयाच्या काही लोकांना घेऊन मोर्चा काढला होता. सरकारचे डोळे उघडण्याकरता हा मोर्चा होता. राज्यभरातून मेसेज येत होते औषधे कमी पडत आहेत.  डॉक्टर आणि डीनवर प्रेशर वाढत होता, औषधे नाहीत तर करायचे काय. आजही आम्ही आरोप लावण्याकरता नाही तर परिस्थिती समजून घ्यायला आलो आहोत असे ठाकरे म्हणाले.

तुम्ही राजीनामा देणार नाहीत, कारण तुमच्यात लाज उरलेली नाही. पण जबाबदारी ढकलू तरी नका ही आमची विनंती आहे, जालन्यात लाठीचार्ज झाल्यावर आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित केले गेले. तो प्रश्न संपला. पण हे कार्यक्रम जे राजकीय नेते घडवून आणतात ते पुढे येऊन जबाबदारी घेणार आहेत का?  असा सवालही ठाकरे यांनी यावेळी सरकारला केला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Latest News

मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना  मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना 
आधुनिक केसरी न्यूज  प्रेम गहलोत  बल्लारपूर : बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी १२.१५ वाजता...
"विद्यापीठ आपल्या गावात' : गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी
‘फेकूनामा’ , ‘चुनावी जुमलेबाजी’....भाजपाच्या जाहीरनाम्याचा नाना पटोले यांनी 'असा' घेतला समाचार 
Breaking News : विदर्भात पावसाचे उन्हाळी अधिवेशन सुरू 
जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!
आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू : सुधीर मुनगंटीवार   
नाना पटोले यांच्यावरील हल्ल्यामागे कोणाचा हात ?